रविवारी (दि. २४ एप्रिल) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आमना- सामना झाला. लखनऊने हा सामना ३६ धावांच्या अंतराने नावावर केला. लखनऊने विजयासाठी मुंबईला १६९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इशान किशनच्या रूपात मुंबईला पहिला झटका बसला. इशान ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईचे सलामीवीर जेव्हा मैदानात आले, तेव्हा रोहित शर्माने (Rohit Sharma) संघाला चांगली सुरुवात दिली. दुसऱ्या बाजूने इशान किशन (Ishan Kishan) संयमी खेळ दाखवत होता. मुंबच्या डावाच्या ८व्या षकात फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई गोलंदाजीसाठी आला. बिश्नोईचा एक बाहेर चाललेला चेंडू इशानने मारण्याचा प्रयत्न केला, पण तो बॅटच्या आतल्या किनाऱ्यावर लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
चेंडू इशानच्या बॅटला लागल्या नंतर यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या (Quinton De Kock) शूजवर पडला आणि स्लीपमध्ये उभा असलेल्या जेसन होल्डरच्या हातात गेला. चेंडूचा आणि जमिनीचा कुठेच संपर्क आला नसल्यामुळे इशानला बाद करार दिला गेला. मात्र, ज्या पद्धतीने त्याने विकेट गमावली, ते पाहून पंचांसह सामना पाहणारा प्रत्येकजण हैराण झाला, हे नक्की. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावार प्रचंड व्हायरल होत आहे.
If you think life is unfair, have a look at Ishan Kishan and his luck😭😑
Perfect example of "When nothing goes right for you"
8(20) literally killed the momentum Rohit was trying to build on the other end#LSGvMI pic.twitter.com/6DIEwB1qBx— Ashwin (@Sudharsan_ak) April 24, 2022
सामन्याचा विचार केला, तर लखनऊने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला मर्यादित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १३२ धावा केल्या. परिणामी मुंबईला ३६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
लखनऊचा कर्णधार केएल राहुलने सामन्यात ६२ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा ठोकल्या. या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी राहुलला सामनावीर देखील निवडले गेले. दुसरीकडे मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार रोहित शर्मा आणि मध्यक्रमातील तिलक वर्मा यांनी सर्वोत्तम योगदान दिले. रोहित आणि तिलकने अनुक्रमे ३९ आणि ३८ धावा केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गेल, वॉर्नर अन् रैनालाही जे जमलं नाही, ते राहुलने मुंबईविरुद्ध करून दाखवलं; बनला थेट ‘टॉपर’
मुंबईविरुद्धच्या ‘त्या’ पराभवानंतर तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्या संयमाचा बांध; शेन वॉटसनचा खुलासा