भारतीय क्रिकेटमध्ये २ एप्रिल हा दिवस खास आहे. याच दिवशी भारतीय संघाने त्यांचा इतिहासातील दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारताचे कर्णधारपद दिग्गज एमएस धोनी याच्या हातात होते आणि विजयासाठी शेवटचा षटकार देखील धोनीनेच मारला होता. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०११ च्या त्या अंतिम सामन्याला आता ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच आनंदात चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) ड्रेसिंग रूममध्ये केक कापून सेलिब्रेशन केले गेले.
भारताने त्यांचा पहिला विश्वचषक कपिल देवच्या नेतृत्वात १९८३ मध्ये जिंकला होता. त्यानंतर संघाने त्यांचा दुसरा विश्वचषक एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात २०११ मध्ये जिंकला. या विश्वचषकाला ११ वर्षे पूर्ण झाल्याने सीएसकेने आनंद साजरा केला. सीएसकेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून खास पोस्ट शेअर केली आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की, खोली प्रवेश करत असताना रविंद्र जडेजा २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धोनीने विजयी षटकार खेचल्यानंतर रवी शास्त्रींचे समालोचन करतानाची प्रसिद्ध वाक्य बोलत आहे. तसेच त्यानंतर चेन्नईचे अन्य सदस्यही आत येतात. यावेळी धोनी जेव्हा आत येतो, तेव्हा त्याला कसलीही कल्पना नसल्याचे दिसते. पण जेव्हा तो केक पाहातो, तेव्हा ‘अच्छा’ म्हणतो. तसेच त्याचवेळी त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्यही दिसते. त्यानंतर तो केक कापताना दिसतो.
https://www.instagram.com/tv/Cb2kMRmFvk0/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, २०११ विश्वचषकाच्या त्या अंतिम सामन्यात भारतासमोर श्रीलंकेचे आव्हान होते. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या नुकसानावर २७७ धावा केल्या. महेला जयवर्धनेने नाबाद १०३ धावांची मोठी खेळी केली होती. कर्णधार कुमार संगकाराने ४८ आणि तिलकरत्ने दिलशानने ३३ धावांचे योगदान दिले होते. भारतासाठी जहीर खान आणि युवराज सिंगने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.
प्रत्युत्तरात भारताने ११४ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. गौतम गंभीर खेळपट्टीवर होता आणि युवराज खेळण्यासाठी येईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. परंतु, धोनीने अचानक युवराजच्या आधी मैदानात एंट्री घेतली. त्याने घेतलेला हा निर्णय योग्य ठरवला आणि मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
गौतम गंभीरने या महत्वाच्या सामन्यात सर्वाधिक ९७ धावांचे योगदान दिले. धोनीने ७९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१ धावा ठोकल्या. धोनी आणि गंभीर यांच्यात १०९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली होती. तसेच युवराज सिंग २४ चेंडूत २१ धावा करून नाबाद राहिला.
महत्वाच्या बातम्या –
Video: भारताच्या त्रिशतकवीराने तोडले चहलचे हॅट्रिकचे स्वप्न, पण फिरकीपटूने दाखवली खिलाडूवृत्ती
Video | डोक्याला चेंडू लागला, तरीही कॅमेरामॅनने दिली केसाला धक्काही न लागल्यासारखी रिऍक्शन
अनुष्काच्या सुंदर फोटोला पाहून विराट पुन्हा एकदा पडला प्रेमात! कमेंट करत म्हणाला, ‘उफ टू हाॅट’