---Advertisement---

“हार्दिकने चांगले प्रदर्शन केल्यावर मला वाटते, माझा मुलगा चांगला खेळतोय”

On: बुधवार, एप्रिल 6, 2022 8:49 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

मोठ्या काळासाठी भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते राहिलेले एमएसके प्रसाद यांनी मोठे विधान केले आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या मागच्या बऱ्याच महिन्यांपासून निराशाजनक प्रदर्शन करत होता, पण आयपीएल २०२२मध्ये त्याला पुन्हा लय सापडल्याचे दिसत आहे. यावर आता एमएसके प्रसाद यांनी हार्दिकचे कौतुक केले आहे.

एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांची निवडकर्त्यांच्या रूपातील कारकीर्द खूपच विवादित राहिली. ते भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज होते, पण भारतीय संघाच्या निवडकर्त्यांच्या रूपात त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. भारताचा अनुभवी फलंदाज अंबाती रायडूने त्यांच्याच कार्यकाळात निवृत्तीची घोषणा केली होती. रायडूच्या मते निवडकर्त्यांकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात होते.

मागच्या वर्षी टी२० विश्वचषकात अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला संधी दिली गेली होती. विश्वचषकात संधी मिळूनही हार्दिक चांगले प्रदर्शन करू शकला नव्हता. त्याने विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजीही केली नव्हती, पण आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये तो सध्या गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागांमध्ये चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. यावर प्रसाद म्हणाले की, “हार्दिक पांड्याचे बेसिक्स सर्व बाजूंनी चांगले आहेत आणि याच कारणास्तव तो सर्वात यशस्वी अष्टपैलू आहे.”

‘बॅकस्टेज विथ बोरिया मजूमदार’ या कार्यक्रमात बोलताना एमएसके प्रसाद म्हणाले की, “जेव्हा कधी चांगले प्रदर्शन करत असेल, तेव्हा मला अभिमान वाटतो आणि मला वाटते की, माझा मुलाने चांगले प्रदर्शन केले किंवा असेच काही. या पोराची खासियत ही आहे की, याचे बेसिक्स खूप पक्के आहेत. त्याच्या गोलंदाजीतील मूळ गोष्टी, फलंदाजीचा पाया, क्षेत्ररक्षणाचा पाया प्रत्येक वेळी खूप भक्कम असतो.”

एमएसके प्रसाद यांनी निवड केलेल्या खेळाडूंविषयी अनेक वाद झाले आहेत, पण दुसरीकडे ही गोष्टही तेवढीच खरी आहे की, त्यांनी निवडलेले अनेक खेळाडू आजही भारतीय संघासाठी चांगले प्रदर्शन करत आहेत. त्यांच्यातील एक म्हणजेच अष्टपैलू हार्दिक पांड्या आहे, जो टी२० विश्वचषक २०२१ नंतर, थेट आयपीएल २०२२ मध्ये खेळताना दिसत आहे. दरम्यानच्या काळात हार्दिकने स्वतःच्या फिटनेसवर काम केले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्यावेळी धोनीने ताहीरला काय सांगितले माहित नाही, पण माझा झेल गेला’, इशान किशनने सांगितला किस्सा

अभिमानास्पद क्षण! पती चहलने विकेट घेताच धनश्री वर्माचे ‘लय भारी’ सेलिब्रेशन; पाहून तुम्हालाही होईल आनंद

ऑस्ट्रेलियाचा विजयरथ सुसाट! पाकिस्तानविरुद्ध कसोटीनंतर आता टी२० मालिकाही केली नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---