शनिवारी (२१ मे) रात्री आयपीएलच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आमना सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, पण दिल्लीसाठी हा सामना शेवटची संधी आहे. या अतिशय महत्वाच्या सामन्याआधी दिल्ली संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात संघात पुनरागमन केले आहे.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पुनरागमन केले आहे. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर (David Warner) मिळून विरोधी संघाचा घाम काढू शकतात. शॉ मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. ताप आल्यामुळे त्याला अचानक रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. त्यानंतर अशी माहिती मिळाली होती की, त्याला टायफाईड झाला होता.
एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, शॉ डावाची सुरुवात करण्यासाठी पुन्हा उपस्थित झाल्यानंतर सरफराज खान मध्यक्रमात खेळताना दिसेल. सरफराजला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवले गेले होते. मुंबई विरुद्धच्या सामन्यात शॉ आणि वॉर्नरची जोडी पुन्हा एकदा डावाची सुरुवात करताना दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, जेव्हापासून पृथ्वी शॉ दिल्लीच्या संघातून बाहेर झाला, तेव्हापासून संघाला अपेक्षित सुरुवात मिळू शकलेली नाहीये. वॉर्नर आणि शॉ जोडी संघाला ज्या पद्धतीने पुढे घेऊन जातात, त्या पद्धतीने दुसऱ्या फलंदाजांना जमले नाही. शॉच्या अनुपस्थितीत संघाने मनदीप सिंग आणि सरफराज खान यांना सलामीवीराच्या रुपात आजमावले, पण संघाच्या अपेक्षेस पात्र ठरले नाहीत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पृथ्वी शॉने आयपीएल २०२२ मधील त्याचा शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला होता. त्यानंतर आता तो थेट मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. चालू हंगामातील त्याचे प्रदर्शन पाहिले, तर त्याने आतापर्यंत १५९.८७ च्या स्ट्राईक रेट आणि २८.७७ च्या सरासरीने २५९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या दोन अर्धशतकांचा देखील समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलनंतर सीएसकेचा दीपक चाहर चढणार बोहल्यावर! लग्नाची तारिख आणि पत्रिका आली समोर
चेन्नईच्या गोलंदाजांना घाम फोडल्यानंतर अश्विनचा मोठा खुलासा, म्हणाला, ‘माझ्यात डेविड वॉर्नर घुसलेला’
मुंबईने शेअर केला अर्जुन तेंडुलकरचा व्हिडिओ, भेदक यॉर्कर वाढवेल दिल्लीच्या फलंदाजांची डोकेदुखी?