---Advertisement---

सलग दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर आरसीबीने भन्नाट गाण्यासह केला जल्लोष; डू प्लेसिस अन् विराटही दिसले व्हिडिओत

On: बुधवार, एप्रिल 6, 2022 4:41 PM
RCB-Team
---Advertisement---

आयपीएलच्या १३व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात आरसीबीने ४ विकेट्स राखून राजस्थानला मात दिली. ड्रेसिंग रूममध्ये विजयानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि माजी कर्णधार विराट कोहली खेळाडूंना प्रोत्साहित करताना दिसले. आरसीबीला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होती, पण त्यानंतर संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात अप्रतिम खेळ दाखवत विजय मिळवला आहे.

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि आरसीबीसाठी त्याने तिन्ही सामन्यात निर्णायक खेळी केली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात देखील कार्तिकने महत्वाची भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फंलदाजी करताना राजस्थानने १७० धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात आरसीबीने हे लक्ष्य ५ चेंडू शिल्लक ठेवत गाठले. कार्तिकने २३ चेंडूत केलेल्या ४४ धावांच्या जोरावर संघाला विजय मिळू शकला. कार्तिकने मागच्या तिन्ही सामन्यात नाबाद खेळी केली आहे.

राजस्थानला धूळ चारल्यानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. खेळाडूंनी या विजयाचा जल्लोष एका खास गाण्यासह साजरा केला. आरसीबीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. गाण्याचे बोल ‘पॅन्ट लाल आहे, शर्ट निळा आहे. सोनेरी सिंह चमकत आहे. आम्ही आरसीबी आहोत. आम्ही बोल्ड खेळत आहोत. स्वतःच्या हिमतीवर अंतिम सामन्यात जाऊ. एक चांगला संघ, जो तुम्हाला कधीच दिसणार नाही. इतर संघ आम्हाला हैराण करू शकत नाहीत. आरसीबीचा खेळाडू असण्यासाठी मला अभिमान आहे. आम्ही आरसीबी आहोत,’ असे आहेत.

 

या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत आरसीबीने सहावा क्रमांक गाठला आहे. पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आणि दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाइट रायडर्स हे संघ आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘सामना कधी हातातून निसटला कळलंच नाही’, आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर सॅमसनची कबुली

बीसीसीआय होणार आणखी श्रीमंत! आयपीएल हक्कांमधून करणार ‘इतक्या’ कोटींची कमाई, दिग्गज कंपन्या लिलावाच्या मैदानात

Video : आधी विराट मग सिराज नंतर सगळेच, वानखेडेवर RCBचे भिडू लागले नाचू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---