भारतात क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. त्यातही इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलप्रती भारतीयांचे प्रेम शब्दांमध्ये समजून घेणे अशक्य आहे. आयपीएलची सुरुवात झाल्यानंतर क्रिकेटचाहत्यांचा उत्साह वेगळ्याच स्तरावर पोहोचतो. नुकतीच आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात झाली आहे. अशात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी, RCB) एका कट्टर चाहत्याने (RCB Fan) त्याच्या कारला फ्रँचायझीच्या रंगामध्ये रंगले आहे. हा तोच चाहता आहे, ज्याने गतवर्षी त्याच्या गाडीला आरसीबीच्या रंगात रंगवले होते.
आरसीबीचा कट्टर चाहता संतोष सदगुरू (Santosh Sadguru) याने शनिवारी (२६ मार्च) मुंबई येथे आयपीएल २०२२ च्या (IPL 2022) हंगामाची सुरुवात होताच सर्वांना सरप्राइज दिले आहे. शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर शहरातील रहिवासी असलेल्या संतोषने त्याच्या जुन्या फिएट कारला आरसीबीच्या लाल रंगात रंगवत फ्रँचायझीवरील आपले प्रेम व्यक्त केले (RCB Fan Modified His Car) आहे.
तसेच त्याने कारच्या दोन्ही बाजूंना आरसीबी असे लिहिले आहे. याखेरीज कारवर दिवंगत कन्नड अभिनेता पुनित राजकुमार आणि त्याचे वडिल व महान कन्नड कलाकार विष्णुवर्धन यांचा फोटो लावला आहे. संतोष सदगुरूने आपीएल २०२१ वेळी त्याच्या आवडत्या संघाला समर्थन करण्यासाठी आपल्या बजाज स्कूटरचा मेकओव्हर केला होता.
आरसीबीचा चाहता संतोषने म्हटले की, प्रत्येकाने आपल्या स्वप्नांना जगले पाहिजे आणि आपल्या इच्छेनुसार आपले जीवन जगले पाहिजे. मला आशा आहे की, आरसीबी यंदाच्या हंगामात ट्रॉफी जिंकेल.
दरम्यान आरसीबीचा पहिला सामना २७ मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईच्या डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.
आयपीएल २०२२ साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभूदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, लवनीथ सिसोदिया, डेव्हिड विली.
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs DC: दिल्लीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; मुंबईकडून ५ खेळाडूंचे पदार्पण