आयपीएलच्या मैदानात मंगळवारी (२६ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जात आहे. आरसीबी आणि राजस्थानमधील हा चालू हंगामातील दुसरा सामना आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने या सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आरसीबीने त्यांच्या फलंदाजी क्रमात महत्वाचा बदल केला.
आरसीबीसाठी आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या पहिल्या सामन्यापासून फाफ डू प्लेसिस आणि अनुज रावत डावाची सुरुवात करत आले आहेत, पण या सामन्यात आरसीबीने मोठ बदल केला. सलामीवीर अनुज रावतच्या जागी रजत पाटीदारला संधी दिली गेली. तसेच अनुजच्या जागी आता विराट कहोली (Virat Kohli) डावाची सुरुवात करताना दिसणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही दोन महत्वाचे बदल पाहायला मिळाले. करुण नायर आणि ओबेद मॅकॉय या दोघांऐवजी डॅरिल मचेल आणि कुलदीप सेन यांना संधी दिली गेली. उभय संघात आयपीएल २०२२मधील पहिला सामना ५ एप्रिलला खेळला गेला होता. या सामन्यात आरसीबीने ४ विकेट्सने विजय मिळवला होता.
चालू हंगामात आरसीबीने खेळलेल्या सुरुवातीच्या ८ सामन्यांमध्ये ५ विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत आरसीबी १० गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. राजस्थानचे चालू हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर सुरुवातीच्या ७ सामन्यांपैकी ५ सामने त्यांनी जिंकले आहेत. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
फाफ डू प्लेसी (कर्णधार), दिनेश कार्तिक, रजत पाटीदार, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, जोश हेजलवूड, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, डॅरिल मिचेल, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
“पोलार्डपेक्षा उनाडकट जास्त चेंडू हिट करतोय”, माजी भारतीय क्रिकेटपटूने साधला निशाणा