आयपीएल २०२२ च्या तयारीत सर्व संघ व्यस्त आहेत. सर्व संघ सराव करत आहेत आणि मुंबई इंडियन्स संघांचे देखील सराव सत्र सुरू आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघ सराव करताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सने स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा त्याचे खतरनाक रूप धारण दिसत आहे. रोहितने या व्हिडिओदरम्यान एक हेलिकॉक्टर शॉट देखील मारला.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या अनेक चाहत्यांनी ट्वीटरवर मागणी केली होती की, रोहित शर्मा (Rohit Sharma) सराव करतानाचा व्हिडिओ शेअर करावा. चाहत्यांची ही मागणी मुंबई इंडियन्से मनावर घेतली आणि रोहितचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये रोहित अनेक मोठे मोठे फटके खेळताना दिसत आहे.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी रोहितच्या नेतृत्वात आतापर्यंत ५ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. मागच्या हंगामात मुंबईचे प्रदर्शन चांगले राहिले नव्हते. परंतु मागच्या आयपीएल हंगामात संघाचे प्रदर्शन अपेक्षित राहिले नव्हते. संघातील काही महत्वाचे खेळाडू खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे संघाच्या एकंदरीत प्रदर्शनावर देखील त्याच्या परिणाम झाल्याचे दिसले होते.
"Post Rohit batting video admin." 🎥🙏
Here you go, Paltan! 😌💙#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/UCXZWYTSnJ
— Mumbai Indians (@mipaltan) March 19, 2022
सध्या रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आणि कर्णधारपदाची भूमिका उत्तम पणे पार पाडत आहे. भारतीय संघाचा कर्णधार बनल्यापासून रोहित जबरदस्त प्रदर्शन करत आहे. भारतीय संघाचे नियमित कर्णधारपद स्वीकारल्यापासून संघाने एकही सामना गमावलेला नाहीय. अशात मुंबई इंडियन्ससाठीही रोहित शर्मा अशाच प्रकारचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा सर्वांना आहे. मुंबईच्या संघात यावर्षी काही नवीन चेहरे सहभागी झाले आहेत. अशात संघाचा ताळमेल बसवणे सराव सत्रात चांगल्या प्रकारे केले जाऊ शकते.
मुंबई इंडियन्साचा संपूर्ण संघ –
रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, अनमोलप्रीत सिंग, अरशद खान, राहुल बुद्धी, रमनदीप सिंग, तिलक वर्मा, बेसिल थम्पी, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, मयंक मारकंडे, मुरुगन अश्विन, रिले मेरेडिथ, टाइमल मिल्स, अर्जुन तेंडुलकर, डेनियल सॅम्स, डेवॉल्ड ब्रेविस, ऋतिक शोकीन, संजय यादव, टिम डेविड, इशान किशन, फॅबियन एलेन, आर्यन जुयाल