---Advertisement---

Video: पॅट कमिन्सच्या वेगवान चेंडूने अभिषेक शर्माच्या उडवल्या दांड्या, पुल शॉट मारण्याचा केलेला प्रयत्न

On: शनिवार, एप्रिल 16, 2022 5:15 PM
Abhishek-Sharma
---Advertisement---

आयपीएल २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करत आहे. कमिन्सने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत कमाल प्रदर्शन करून दाखवले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शुक्रवारी (१५ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये कमिन्सने स्वतःच्या पहिल्याच षटकत विकेट घेतली. हैदराबातचा सलामीवीर अभिषेक शर्मा कमिन्सचा शिकार ठरला.

सनरायझर्स हैदराबादचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) कमिन्सच्या या चेंडूवर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात दिसला. परंतु, त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला. या विकेटनंतर गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने डावाचे दुसरे षटक टाकण्यासाठी कमिन्सला बोलावले. कमिन्सने षटकातील चौथा चेंडू १३८ किमी ताशी वेगापेक्षा जास्त गतीने टाकला. हा इनस्वींग चेंडू अभिषेकच्या बॅटचा आतला किनारा घेत स्टंपमध्ये घुसला. अभिषेक शर्माने १० चेंडूत अवघ्या ३ धावा करून विकेट मावली.

सामन्यावार एकंदरीत नजर टाकली, तर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ८ विकेट्सच्या नुकसानावर १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने मिळालेले १७६ धावांचे लक्ष्य तीन विकेट्सच्या नुकसानावर आणि १७.५ षटकात गाठले.

केकेआरसाठी मध्यक्रमातील नितिश राणाने ३६ चेंडूत सर्वाधिक ५४ धावा केल्या. तसेच आंद्रे रसलने २५ चेंडू खेळत ४९ धावांचे योगदान दिले. तर दुसरीकडे हैदराबादला मिळालेल्या विजयात राहुल त्रिपाठीचे योगदान सर्वात महत्वाचे ठरले. राहुल त्रिपाठीने ३७ चेंडूत ७१ धावा ठोकल्या. तसेच एडम मार्करमने ३६ चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी केली.

https://twitter.com/Ariz_khan_zsk/status/1515001861849300994

पॅट कमिन्सन आयपीएल खेळण्यापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी काही महत्वाच्या मालिका जिंकून आला आहे. त्याने ऍशेसमध्ये इंग्लंडला ४-० असे पराभूत केले होते. तसेच पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका देखील जिंकली होती. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात कमिन्सने ८ विकेट्स नावावर केल्या होत्या. आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाज कमिन्सने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---