आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. यावर्षी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन फ्रेंचाेयझी सहभागी झाल्यामुळे स्पर्थेत ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत. १२ आणि १३ फेब्रुवारीला झालेल्या मेगा लिलावात सर्व फ्रेंचायझींनी त्यांच्या गरजांप्रमाणे खेळाडूंना विकत घेतले आणि संघ तयार केला. गुजरात टायटन्सने भारताचा अनुभवी अष्टपैलू हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवले आहे.
मेगा लिलावापूर्वी गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याला संघात घेण्यासाठी १५ कोटी खर्च केले. तसेच त्याला कर्णधारही बनवले. त्याव्यतिरिक्त अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) यालाही फ्रेंचायझीने १५ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले. भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याला संघात घेण्यासाठी फ्रेंचायझीने ७ कोटी खर्च केले.
त्यानंतर मेगा लिलावात गुजरात टायटन्सने वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनला (Lockie Furguson) १० कोटी, भारतीय अष्टपैलू राहुल तेवतियाला (Rahul Tewatia) ९ कोटी, तसेच मोहम्मद शमीला (Mohammed Shami) ६.२५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. हे तीन खेळाडू मेगा लिलावात गुजरातने घेतलेले सर्वात महागडे खेळाडू ठरले. त्याव्यतिरिक्त गुजरात संघात अनुभवी यष्टीरक्षक मॅथ्यू वेड, डेविड मिलर आणि जोसेफ अल्जारीया यांसारख्या विदेशी दिग्गजांचीही भरमार आहे. असे असले तरी, इंग्लंडचा दमदार सलामीवीर जेसन रॉयने आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे संघाला मोठा झटका बसला आहे.
गोलंदाजी असेल संघाची ताकद
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा एकंदरित विचार केला, तर गोलंदाजी हा त्यांचा भक्कम विभाग आहे. संघात भारतीय आणि विदशातील काही जबरदस्त गोलंदाज आहेत. आयपीएल फ्रेंचायझी शक्यतो भारतीय गोलंदाजांना संघात महत्व देत असतात. पण गुजरातने विदेशी खेळाडूंवरही अधिक विश्वास दाखवला आहे. संघात भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीसा समावेश आहे. मागच्या हंगामात पंजाब किंग्जसाठी खेळताना शमीने चांगले प्रदर्शन केले होते. शेवटच्या षटकांमध्ये शमी घातक ठरू शकतो.
फिरकी गोलंदाज राशिद खान जगातील जवळपास सर्व टी-२० लीगमध्ये खेळला आहे. समोर कोणताही फलंदाज असला, तर राशिद त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवू शकतो. तसेच संघात लॉकी फर्ग्यूसनही आहे, जो साधारणतः १५० किमीच्या ताशी वेगाने गोलंदाजी करू शकतो.
संघाचा मध्यक्रम कमजोर
गुजरात टायटन्ससाठी जी गोष्ट चिंतेची बाब ठरू शकते, ती म्हणजे संघातील फलंदाज. कर्णधार हार्दिक पांड्या असे प्रदर्शन करेल, याविषयी कोणीच खात्रीशीर सांगू शकत नाही. मागच्या मोठ्या काळापासून हार्दिक खराब फॉर्मध्ये आहे, त्यामुळे तो कसे प्रदर्शन करेल याविषयी संभ्रम आहे. तसेच इंग्लंडच्या जेसन रॉयने अचानक आयपीएलमधून माघार घेतल्यामुळेही संघाची अडचण वाढली आहे.
फ्रँचायझीकडे मध्यक्रमात अनुभवाची कमतरता आहे. संघात डेविड मिलर, मॅथ्यू वेड आणि विजय शंकर याच्यासारखे खेळाडू आहेत, पण त्यापैकी कोणीच अलिकडच्या काळात चांगली कामगिरी केली नाही. अशात विरोधी संघ गुजरातच्या फलंदाजी क्रमाला सहजासहजी उध्वस्त करू शकतात.
असे असले तरी, संघाने युवा फलंदाज शुभमन गिलवर विश्वास दाखवून त्याला संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे. गिल आगामी हंगामात चांगले प्रदर्शन करेल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. गिलच्या रूपात गुजरात टायटन्सने असा खेळाडू संघासोबत जोडला आहे, जो पुढच्या मोठ्या काळापर्यंत संघासोबत राहू शकतो.
आयपीएल २०२२ साठी गुजरात टायटन्सचे संपूर्ण संघ –
हार्दिक पंडया (कर्णधार), राशिद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन, अभिनव सदारंगिनी, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर साई किशोर, डोमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नलकंडे, यश दयाल, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवान, डेविड मिलर, ऋद्धिमान साहा, मैथ्यू वेड, गुरकीरत सिंह मान, वरुण एरॉन, बी साई सुदर्शन.