आतापर्यंत आयपीएलचे (IPL) एकूण १४ हंगाम खेळले गेले आहेत. यादरम्यान अनेक खेळाडूंना स्वतःची एक वेगळी ओळख मिळाली आहे. अनेक युवा खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली, ज्यांनी पुढे राष्ट्रीय संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले. तर काही खेळाडू होते, जे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासूनच सर्वात महागडे ठरले होते. या खेळाडूंनी आधीच आंततराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते आणि त्याच कारणास्तव त्यांना आयपीलमध्ये खेळण्यासाठी मोठी रक्कम मिळाली होती. आपण या लेखात अशाच तीन भारतीय दिग्गजांबाबत चर्चा करणार आहोत, ज्यांना आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच आयपीएल २००८ सर्वाधिक किमतीत विकत घेतले गेले होते.
२००८ आयपीएलमध्ये सर्वात महागडे ठरलेले ३ भारतीय दिग्गज
3. इरफान पठाण
इरफान पठाण २००८ साली भारतीय संघाचा एक दिग्गज अष्टपैलू होता. आयपीएल २००८ च्या लिलावापूर्वी भारतीय संघाने टी२० विश्वचषक जिंकला होता आणि त्या संघात इरफान पठाणचाही समावेश होता. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील प्रदर्शनासाठी इरफानला सामनावीर पुरस्कारही दिला गेला होता. याच पार्श्वभूमीवर पंजाब किंग्जने मोठी रक्कम खर्च करून त्याला संघात सामील केले होते.
इरफान पठाणने या पहिल्या हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये २१.२० च्या स्ट्राइक रेटने १५ विकेट्स घेतल्या आणि ११२.९३ च्या स्ट्राइक रेटने १३१ धावाही केल्या. त्यानंतर त्याने दिल्ली डेयरडेविल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचेही प्रतिनिधित्व केले. २०१७ मध्ये गुजरात लायन्ससाठी त्याने कारकिर्दीतील शेवटचा आयपीएल सामना खेळला. इरफानच्या एकंदरित आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने १०३ सामन्यांमध्ये ८० विकेट्स घेतल्या आणि ११३९ धावा केल्या. सध्या तो समालोचनाचे काम करत आहे.
2. इशांत शर्मा
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला २००८ आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाने मोठी रक्कम खर्च करून विकत घेतले होते. त्या हंगामात इशांतने खेळल्या १३ सामन्यांमध्ये तो केवळ ८ विकेट्स घेऊ शकला होता. त्यानंतर आयपीएल २०१३ मध्ये इशांतने सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आणि उत्कृष्ट प्रदर्शन करत १५ विकेट्स घेतल्या.
२०१८ मध्ये इशांत शर्मावर कोणत्याच आयपीएल संघाने बोली लावली नव्हती. त्यानंतर २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला १.१ करोड रुपयांमध्ये खरेदी केले. सध्या इशांतला भारताच्या केवळ कसोटी संघात संधी मिळत आहे. मर्यादित षटकांमध्ये त्याच्या नावावर निवडकर्त्ये विचारही करताना दिसत नाहीत.
1. महेंद्र सिंह धोनी ($1.5 मिलियन)
२००७ साली इतिहासातील पहिला टी२० विश्वचषक खेळला गेला आणि भारताने ही ट्रॉफी जिंकली. कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ही कमाल केली होती. या प्रदर्शनानंतर आयपीएल २००८ मध्ये धोनी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. चेन्नई सुपर किंग्जने त्याला १.५ मिलियन डॉलर्समध्ये विकत घेतले होते. पहिल्या आयपीएल हंगामात धोनीने खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये १३३.५४ च्या स्ट्राइक रेटने ४१४ धावा केल्या होत्या.
भारतीय संघाच्या महान कर्णधारांपैकी एक एमएस धोनीने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जला एकूण चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे. चेन्नई संघाने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सध्या फक्त आयपीएलमध्ये खेळत आहे.
महत्वाच्या बातम्या –
“आता फक्त तेच इंग्लंड क्रिकेटला सुधारतील”; माजी कर्णधाराने प्रशिक्षकपदासाठी सुचविले नाव
जरा इकडे पाहा! वेस्ट इंडिजविरुद्ध ‘हा’ कारनामा केलाय फक्त भारताच्या कर्णधार-उपकर्णधारांनी
भारत-न्यूझीलंड मालिका ढकलली पुढे; पाहून घ्या सुधारीत वेळापत्रक