भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने (Virat Kohli) काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील कर्णधार सोडण्याबरोबरच आयपीएलमध्ये राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाचे (RCB) देखील कर्णधारपद सोडले आहे. तो आयपीएलच्या (IPL 2022) १५ व्या हंगामात फक्त फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. तो आरसीबी फ्रॅंचायझीसोबत पहिल्या हंगामापासून आहे. सध्या तो फ्रॅंचायझीचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचे आरसीबी संघात खास स्थान आहे, परंतु एक काळ असा सुद्धा होता की आरसीबीने त्याला मोडलेल्या गाडीतून विमानतळावर पाठवले होते आणि इतर खेळांडूंसाठी चांगली गाडी पाठवली होती.
एका पाॅडकास्टमध्ये विराटने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे. त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामाचा हा किस्सा आहे. २००८ मध्ये कोहली १९ वर्षाखालील संघाचा भाग होता. त्यानंतर तो त्याचवर्षी आरसीबी संघाही भाग झाला.
कोहली आरसीबीच्या पाॅडकास्टमध्ये म्हणाला, ‘मी १९ वर्षाखालील खेळाडू होतो. त्यामुळे माझ्यासाठी तुटलेली ओमिनी गाडी पाठवण्यात आली आणि इतर खेळाडूंना चांगली गाडी पाठवण्यात आली होती. त्या गाडीत बसण्यासाठी केवळ मी एकटाच उरलो होतो. त्यांना कदाचित असे वाटले होते की, मला काही तरी द्यावे आणि विमानतळावर सोडावे.’
विराट म्हणाला की, फक्त गाडीचे माॅडेलच जूने नव्हते, तर गाडीच खूप खराब होती. गाडीतूनच रस्ता दिसत होता. गाडी आपल्या शेवटच्या स्तरावर होती. या काळात कोहली आयपीएलमध्ये उत्तम खेळी खेळू शकला नव्हता, कारण तो या घटनेमुळे खूपच निराश होता. २०१६ चा हंगाम त्याच्यासाठी चांगला होता, मात्र त्या आयपीएल हंगामात आरसीबीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
विराटने आपल्या आयपीएल कारकिर्दीत २०७ सामन्यांत ६२८३ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतकांचा आणि ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजीत ही २०७ सामन्यांत ३६८ धावा देत ४ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलचा १५ वा हंगाम २६ मार्चपासून सुरु होत आहे. यावर्षी हंगामात ८ नव्हे तर १० संघ खेळताना दिसणार आहेत. सर्व सामने मुंबई आणि पुण्यामध्ये पार पडणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कब खून खोलेगा रे तेरा’, बाबर आझमने २ वर्षांनंतर शतक केल्याने विराट कोहली होतोय ट्रोल
अश्विनकडून जास्तीत-जास्त शिकण्याचा प्रयत्न करणार ‘हा’ युवा अष्टपैलू; म्हणाला…