इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर होणार हा सामना आयपीएल 2023 मधील महत्त्वाचा सामना ठरण्याची शक्यता आहे. कारण, या सामन्यातून इतर संघांचा देखील पुढचा प्रवास कसा राहतो, हे अवलंबून आहे.
सध्या आयपीएल 2023 आपल्या बिजनेस एंडकडे चालली आहे. साखळी फेरीतील केवळ 16 सामने शिल्लक असताना एकाही संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला नसून, कोणताही संघ अद्याप स्पर्धेतून बाहेर पडलेला नाही. त्यामुळे चेन्नई विरुद्ध दिल्ली या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नईने आतापर्यंत 11 सामने खेळताना 6 विजय व 4 पराभव स्वीकारले आहेत. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना एक गुण यातून मिळाला होता. चेन्नई सध्या 13 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी काबीज आहे. दुसरीकडे दिल्लीने खराब सुरुवातीनंतर शानदार पुनरागमन करत सलग विजय मिळवले आहेत. असे असले तरी 10 सामन्यातील 4 विजयांसह ते गुणतालिकेत अखेरच्या स्थानी आहेत. या सामन्यात विजय मिळवल्यास चेन्नई प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या अगदी जवळ पोहोचेल. तर, दिल्ली पराभूत झाल्यास त्यांना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागेल. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयासाठी आटोकाट प्रयत्न करतील.
भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7.30 वाजता चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे.
चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन- ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), दीपक चहर, महिश तिक्षणा, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे.
दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रायली रूसो, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
(IPL 2023 CSKvDC Match Preview)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वानखेडेत चमकला मुंबईचा ‘सूर्य’, 83 धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर रचला ‘हा’ जबरदस्त विक्रम, वाचाच
आयपीएलमधील रोहितचा सर्वात वाईट काळ! मागच्या पाच इनिंग्ज विसरलेल्याच बऱ्या