इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला चेन्नई सुपर किंग्स संघाच्या रूपात विजेता मिळाला. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नईने गुजरात टायटन्स संघाला अंतिम सामन्यात पराभवाचा धोबीपछाड दिला. यासह चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली. या विजयानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. यामध्ये संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर आघाडीवर राहिला. चाहरने मैदानावर जल्लोष केलाच, पण तो जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा ढोल-ताशांच्या आवाजावर तो स्वत:ला रोखू शकला नाही. त्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
दीपक चाहर डान्स व्हिडिओ
दीपक चाहर (Deepak Chahar) याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दीपक चाहर पत्नी जया भारद्वाज (Deepak Chahar With Wife Jaya Bhardwaj) हिच्यासोबत दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ढोलचा आवाज येत आहे. याच आवाजाच्या तालावर चाहर जोरदार डान्स करताना दिसत आहे. चेन्नईची जर्सी परिधान करून चाहरने तुफान डान्स करत विजयाचा आनंद व्यक्त केला. चाहरचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
गुजरातविरुद्धची कामगिरी
दीपक चाहर याच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 4 षटके गोलंदाजी केली. यावेळी गोलंदाजी करताना त्याने 38 धावा खर्च केल्या होत्या. विशेष म्हणजे, त्याने गुजरात टायटन्स संघाचा विस्फोटक सलामीवीर वृद्धिमान साहा याला 54 धावांवर असताना झेलबाद केले होते. एवढंच नाही, तर चाहरने संपूर्ण हंगामात चांगले प्रदर्शन केले. त्याने 10 सामन्यात 22.85च्या सरासरीने 13 विकेट्स चटकावल्या. यादरम्यान त्याने 8.74च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली.
चेन्नई-गुजरात सामन्यात झालेला पहिला सामना
खरं तर, आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात 31 मार्च रोजी खेळला गेला होता. हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नईला 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर चेपॉक येथे स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने होते. त्यात चेन्नईने 15 धावांनी विजय मिळवला होता.
पहिल्या क्वालिफायर सामन्यात आमने-सामने आल्यानंतर दोन्ही संघांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही एकमेकांचा सामना केला. यावेळी पुन्हा चेन्नईने गुजरातला पराभवाचा धक्का दिला. नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथील अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरातवर डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, हंगामाची ट्रॉफी आपल्या नावावर केली. (ipl 2023 final pacer deepak chahar dance in hotel after chennai super kings champion)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये पूर्वी सचिन आणि विराट ज्या सदम्यातून गेले, तो यावर्षी शुबमन गिलला बसला
पराभवाने खचला नाही हार्दिक पंड्या; धोनीबाबत मोठे विधान करत म्हणाला, ‘चांगल्या लोकांसोबत नेहमी…’