---Advertisement---

आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल

Mumbai-Indians
---Advertisement---

रविवारी (दि. 28 मे) सर्वांच्या नजरा आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्यावर आहेत. दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आमने-सामने असणार आहेत. याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाने सोशल मीडियावर एक भावूक करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सर्व खेळाडू घरी परतण्याच्या तयारीदरम्यान भावूक दिसले.

खरं तर, रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरुद्ध पराभूत झाला होता. या सामन्यात विजय मिळवत गुजरात संघ सलग दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला. शनिवारी (दि. 27 मे) फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ड्रेसिंग रूममधील एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत सर्व खेळाडू स्पर्धेबाहेर झाल्यामुळे निराश दिसले. तसेच, सर्व खेळाडू एकमेकांना मिठी मारत भावूकही झाले. स्पर्धेच्या आठवणी सोबत ठेवण्यासाठी खेळाडूंनी एकमेकांच्या जर्सीवर स्वाक्षरीदेखील केली.

https://www.instagram.com/reel/CswCL3SOpCb/?utm_source=ig_embed&ig_rid=fbb58876-58af-4f08-8918-50cc0ec8c88c

आयपीएल 2023मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रदर्शन
मुंबई इंडियन्स संघाच्या या हंगामातील प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी 14 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले. त्यासह 16 गुणांसह प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले होते. मात्र, प्ले-ऑफ फेरीत संघाने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला पराभूत केले होते. मात्र, क्वालिफायर 2 सामन्यात गुजरातने मुंबईला 62 धावांनी पराभवाचा धक्का दिला. या हंगामात फलंदाजांनी विशेषत: सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, कॅमरून ग्रीन आणि टीम डेविड यांनी संघाला संकटातून बाहेर काढला.

यानंतर अंतिम सामन्यात आकाश मधवाल (Akash Madhwal) यानेही गोलंदाजीत कमाल केली. फिरकी गोलंदाजी विभागाची धुरा सांभाळणाऱ्या पीयुष चावला (Piyush Chawla) याने 22 विकेट्स घेतल्या. संघ प्ले-ऑफमध्ये 6 वर्षांनंतर (2017नंतर) पराभूत झाला. शेवटी 2017 हंगामात रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून पराभूत झाला होता. (ipl 2023 mumbai indians players get emotional during home coming know here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र प्रिमीयर लीगमधील सहभागावरून ऋतुराजवर टीकेची झोड, चाहते म्हणतायेत, “तू आता…”
मानलं रे पठ्ठ्या! सराव सत्रातच दुबेचा राडा, IPL फायनलमध्ये होणार तांडव; मोठा विक्रम निशाण्यावर, Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---