नव्या दमाचे युवा खेळाडू आयपीएल 2023 स्पर्धेत आपली छाप सोडताना दिसत आहेत. त्या खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड याच्या नावाचाही समावेश आहे. ऋतुराज चेन्नई सुपर किंग्स संघाकडून सलामीला उतरतो. ऋतुराजने सीएसकेसाठी या हंगामात वादळी फलंदाजी करत आपले नाणे खणकावले आहे. बुधवारी (दि. 23 मे) गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षित होती, आणि तो त्या अपेक्षेवर खरा उतराला. मात्र, डावाच्या दुसऱ्याच षटकात तो थोडक्यात बचावला.
झाले असे की, चेन्नईच्या डावातील दुसरे षटक हंगामातील आपला पहिलाच सामना खेळत असलेला दर्शन नळकांडे (Darshan Nalkande) टाकत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नळकांडेने ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला बाद केले होते. मात्र, तो नो-बॉल ठरला आणि ऋतुराजला फ्री हिट मिळाला. या चेंडूवर ऋतुराजने खणखणीत षटकार खेचला. ऋतुराजचा यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
जीवनदानचा फायदा
झाले असे की, दर्शनने दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंप्सजवळ लेंथवर टाकला. यावेळी ऋतुराजने शरीरापासून दूर मारण्याचा प्रयत्न केला, पण बॅटची कड घेत चेंडू मिड विकेटवर उभ्या असलेल्या शुबमन गिल याने सोपा झेल घेतला. मात्र, तिसऱ्या पंचांनी हा नो-बॉल दिला आणि ऋतुराजला जीवनदानसह एक फ्री हिटही मिळाला. यानंतर त्याने पुढच्या चेंडूवर मिड विकेटच्या वरून षटकार मारला. तसेच, पुढच्या चेंडूवरही त्याने चौकार मारला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. शेवटचा चेंडू निर्धाव राहिला. या षटकात एकूण 14 धावा आल्या.
Gaikwad: From🙁 to 🤩
A twist of fate sees Ruturaj maximize with the bat in #GTvCSK ⚔️#IPLPlayOffs #IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL | @ChennaiIPL pic.twitter.com/dOfabAaXTS
— JioCinema (@JioCinema) May 23, 2023
ऋतुराजचे अर्धशतक
जीवनदान मिळाल्याचा फायदा उचलत ऋतुराजने सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांचा घाम काढत 44 चेंडूत 60 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. त्याने 36 चेंडूत अर्धशतक साकारले. हे त्याचे हंगामातील चौथे अर्धशतक ठरले. (ipl 2023 ruturaj gaikwad survives as darshan nalkande bowls a no ball see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या Qualifierमध्ये चमकली ऋतुराज-कॉनवेची जोडी, 87 धावांच्या भागीदारीने घडवला इतिहास, वाचाच
BIG BREAKING: वेस्ट इंडिजचा बडा क्रिकेटपटू फिक्सिंग प्रकरणात निलंबित, क्रिकेटविश्वात खळबळ