इंडियन प्रीमिअर लीग 2023मध्ये एका नवीन नियमाची सुरुवात झाली आहे. तो नियम इतर कोणता नाही, तर ‘इम्पॅक्ट प्लेअर‘ हा आहे. या नियमांतर्गत दोन्ही संघ एक-एक खेळाडूंना विश्रांती देऊन त्यांच्या जागी सब्स्टिट्यूट खेळाडूला मैदानात उतरवले जाते. नाणेफेकीनंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना 5-5 सब्स्टिट्यूट खेळाडूंची नावे द्यायची असतात. या नियमांतर्गत आता सामन्यात 11ऐवजी 12 खेळाडू खेळू शकतात. 12व्या खेळाडूला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणतात. या नियमाचा अनेक संघांनी फायदा घेतला आहे. यावर आजी-माजी खेळाडूंनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
क्षेत्ररक्षणाशिवाय फलंदाजी करणे सोपे नाही
अधिकतर फलंदाज, जे क्षेत्ररक्षण केल्याशिवाय फलंदाजी करण्यासाठी येत आहेत, ते जास्त धावा करण्यात यशस्वी होत नाहीयेत. खरं तर, आयपीएल 2023च्या 37व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स (Rajasthan Royal vs Chennai Super Kings) आमने-सामने होते. या सामन्यात अंबाती रायुडू (Ambati Rayudu) युवा आकाश सिंग याच्या जागी चौथ्या क्रमांकावर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला. मात्र, तो खातं न खोलताच बाद झाला. रायुडू बाद झाल्यानंतर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी या नियमाविषयी प्रश्न उपस्थित केले.
काय म्हणाले गावसकर?
क्षेत्ररक्षण केल्याशिवाय थेट फलंदाजी करण्याच्या निर्णयावर गावसकर यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “तुम्ही क्षेत्ररक्षण केल्याशिवाय फलंदाजी करण्यासाठी येता आणि मोठे शॉट्स मारण्याचा प्रयत्न करता. असे फलंदाज म्हणून तुम्ही यशस्वी होऊ शकत नाहीत.” त्यांनी यावेळी रायुडूचे उदाहरण देऊन समजावले. त्यांनी पुढे म्हटले की, “नो फिल्डिंग, नो स्कोरिंग. रायडू खातं न खोलताच बाद झाला.”
बेंगलोरसाठी फायद्याचा नियम
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात सर्व संघ ‘इम्पॅक्ट प्लेअर’ (Impact Player) या नियमाचा पुरेपूर फायदा घेत आहेत. मात्र, दिल्ली कॅपिटल्स संघाला याचा फायदा घेण्यात अपयश आले. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ या नियमाचा पूर्ण फायदा घेत आहे. मागील काही सामन्यांमध्ये दिल्लीने सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ताफ्यात घेतले. म्हणजेच तो फक्त फलंदाजी करण्यासाठी आला, पण त्याला खास कामगिरी करता आली नाही. तसेच, बेंगलोरकडून फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने या नियमाचा चांगला फायदा घेतला आहे. (ipl 2023 sunil gavaskar angry about impact player rule gave unique advice to batsmen)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2019मध्ये धोनीच्या मैदानावरील जाण्याविषयी माजी सहकाऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘त्याला पश्चाताप…’
अफलातून! 21 वर्षीय जयसवालच्या खणखणीत षटकारामुळे CSKच्या चीअरलीडर्समध्ये खळबळ, पाहा व्हिडिओ