आयपीएल २०२४ च्या ५३व्या सामन्यात आज पंजाब किंग्जसमोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. हा सामना धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
पंजाबचा कर्णधार सॅम करन – आम्ही गोलंदाजी करणार आहोत. दुपारची मॅच आहे, आमच्या संघात कोणताही बदल नाही. आम्ही दोन चांगले विजय मिळवले आहेत. मॅचदरम्यान परिस्थितीत बदल होणार नाही अशी अपेक्षा आहे.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड – आम्ही विरोधकांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहत नाही. आम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करतो आणि आम्ही काय करू शकतो ते पाहतो. या हंगामात अनेक दुखापती, फ्लू आणि सक्तीचे बदल झाले आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या संघासोबत छेडछाड करावी लागली. मुस्तफिजूरच्या जागी सॅन्टनर आला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग ११
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, हरप्रीत सिंग भाटिया, तनय त्यागराजन, विद्वथ कवेरप्पा, ऋषी धवन
चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी
प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. आयपीएल २०२४ च्या प्लेऑफची शर्यत आता खूपच रंजक झाली आहे. चेन्नई 10 सामन्यांतून 10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यांच्या वर हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स आहेत. त्यांची स्थिती चेन्नईपेक्षा चांगली आहे. अशा परिस्थितीत चेन्नईला दुसऱ्यांवर अवलंबून न राहता प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील.
दुसरीकडे, चेन्नईला गेल्या सामन्यात पराभूत केल्यानंतर पंजाब किंग्जचं मनोबल खूप वाढलं आहे. पंजाबचा संघ आपल्या दुसऱ्या घरच्या मैदानावर सीएसकेला सलग सहाव्यांदा पराभूत करू इच्छितो. मात्र सध्या वेगवान गोलंदाजी हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. तर पंजाबचे फिरकी गोलंदाज आणि फलंदाज आपली कामगिरी चोख बजावत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीची घातक गोलंदाजी, गुजरातला १४७ धावांवर केलं ऑलआऊट