आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यानं आयपीएलला सुरुवात होईल.
मात्र हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. एका रिपोर्टनुसार, आयपीएल 2024 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जाऊ शकतो. यावर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हा निर्णय घेऊ शकतं. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज (16 मार्च) जाहीर होणार आहेत.
रिपोर्टनुसार, आयपीएल 2024 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवला जाऊ शकतो. सामन्याचं वेळापत्रक आणि निवडणुकीची तारीख एकाच वेळी आल्यास हा निर्णय घेतला जाईल. बीसीसीआयनं पहिल्या 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. उर्वरित सामने दुबईला हलवता येतील.
आयपीएलचे सामने याआधीही यूएईमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. आयपीएल 2020 चे सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथे खेळले गेले होते. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयनं हा निर्णय घेतला होता. तर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचे सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले होते. 2014 च्या हंगामातील पहिला सामना अबुधाबी येथे खेळला गेला. यानंतर शारजा आणि दुबई येथे सामने झाले. 2014 च्या हंगामातील 20 सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. यानंतरचे सर्व सामने भारतात खेळवले गेले.
आयपीएल 2024 चा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 22 मार्च होणार आहे. हा सामना चेन्नईत खेळला जाईल. बीसीसीआयनं या हंगामातील पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केलं, ज्यामध्ये चेन्नईचे 4 सामने आहेत. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सशी आहे. हा सामना अहमदाबादमध्ये खेळला जाईल. सध्याच्या वेळापत्रकानुसार 21 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. हा सामना 7 एप्रिल रोजी लखनौमध्ये खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईविरुद्ध आरसीबीच्या विजयानंतर स्मृती मानधना भावूक, मैदानावर अश्रू आवरले नाहीत; पाहा व्हिडिओ
महेंद्रसिंंह धोनीनंतर कोण होणार चेन्नईचा पुढील कर्णधार? ‘हे’ खेळाडू आहे शर्यतीत
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी 20 विश्वचषकातील भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर