आयपीएल 2024 मध्ये आजच्या 18व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद समोर चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट चांगली दिसते. संपूर्ण सामन्यामध्ये ती अशीच राहिली पाहिजे. येथे गेल्या वेळी 500 धावा झाल्या होत्या. आमच्याकडे एक उत्तम टीम आहे. मयंक अग्रवालची तब्येत खराब आहे. त्याच्या जागी नितीश रेड्डी आला आहे.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड – आमचं सर्व चांगसं चाललंय. टीम चांगला प्रतिसाद देत आहे. माझ्यासाठी काहीही बदललेले नाही. हे एक नवीन आव्हान आहे, परंतु मला चांगलं वाटतंय. पाथीराना आजारी आहे. आमच्या संघात तीन बदल आहेत. मोईन अली, तीक्षणा आणि मुकेश चौधरी टीममध्ये आले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा
चालू हंगामात दोन्ही संघांनी आतापर्यंत तीन सामने खेळले असून, चेन्नई सुपर किंग्जने दोन सामने जिंकले आहेत तर सनरायझर्स हैदराबादनं एक सामना जिंकला आहे. सनरायझर्स हैदराबादचा हा घरच्या मैदानावरील दुसरा सामना आहे. मागील सामन्यात हैदराबादनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता.
चेन्नई सुपर किंग्सनं घरच्या मैदानावर हंगामातील पहिले दोन सामने जिंकले. परंतु शेवटच्या सामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव पत्कारावा लागला. गुणतालिकेत हैदराबादची टीम तीन सामन्यात 2 गुणांसह सातव्या स्थानी असून चेन्नई तेवढ्याच सामन्यात 4 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग तीन पराभवानंतर हार्दिक पांड्या महादेवाच्या चरणी, सोमनाथ मंदिरात केली पूजा
कोण आहे आशुतोष शर्मा? पठ्ठ्यानं केवळ 11 चेंडूत ठोकलंय अर्धशतक! जाणून घ्या