आयपीएलचा 17 वा हंगाम कधी आणि केव्हा सुरू होणार यावर अनेक प्रश्न निर्माण केले होते. पण ही स्पर्धा 22 मार्चपासून ही सुरू होणार आहे, अशी आशा चाहत्यांना आहे. याबरोबरच आता चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) सीईओ काशी विश्वनाथन यांनीही याबाबत माहिती दिली आहे. तथापि, यापूर्वी आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनीही 22 मार्चपासून स्पर्धा सुरू करण्याची योजना असल्याचे सांगितले होते. तसेच काशी विश्वनाथन यांनी उद्घाटन सोहळ्याबाबत एक मोठी माहिती सध्या समोर आली आहे.
याबरोबरच चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथन म्हणाले आहेत की चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी आपला पहिला सामना कुठे खेळेल आणि कोणाविरुद्ध खेळेल हे स्पष्ट नाही. मात्र क्रिकबझशी बोलताना ते म्हणाले आहेत की, आयपीएलने सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभ आयोजित करण्याची योजना आखली आहे. तसेच त्यानी सांगितले की चेन्नई संघ गतविजेता आहे आणि त्यामुळेच या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
▶️BIG IPL UPDATE▶️
IPL 2024 to start from March 22 with the opening game to be played in Chennai
More details: https://t.co/BXp7VKno5z#IPL2024 #IPL pic.twitter.com/BLvUuHGYDU
— Cricbuzz (@cricbuzz) February 21, 2024
अशातच, IPL 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाऊ शकतो, अशी माहितीही Cricbuzz ने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. मात्र, अद्याप पूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे त्याचे वेळापत्रक दोन भागात येणार असल्याचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे आणि त्यानंतर निवडणुकीच्या तारखांनुसार पुढील वेळापत्रक ठरवले जाईल.
IPL 2024 15 days schedule to be announced tomorrow at 5 pm IST on Star Sports and Jio Cinema
Opening game 22 March CSK vs GT at Chepauk
Final on 26 May
Rest schedule after election dates are announced !India ka tyohaar is here 🫶#IPL2024 pic.twitter.com/JJdQayqMiA
— Khushi (@Khushi_1817) February 21, 2024
दरम्यान, आयपीएल 2024 च्या वेळापत्रकाबद्दल कोणालाही याची कोणतीही तारीख अद्याप माहित नाही. पण बुधवारी रात्री अचानक सोशल मीडियावर एक खळबळ उडाली की गुरुवार 22 फेब्रुवारीला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. IPL चे वेळापत्रक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमावर रिलीज होणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर दिसू लागल्या आहेत. यामध्ये पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याचेही लोकांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND Vs ENG : रांची कसोटी जसप्रीत बुमराहला खेळायची होती, मग बीसीसीआयने का दिली विश्रांती? वाचा सविस्तर
- दुसऱ्यांदा वडील बनल्यानंतर दिसली विराटची पहिली झलक! समोर आला विदेशातील खास फोटो