इंडियन प्रीमियर लीग 2024चा 17वा हंगाम शुक्रवारी (22 मार्च) सुरू होत आहे. पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयोजित केला गेला आहे. जेव्हा कधी आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांचा उल्लेख केला जाईल, त्यात एमएस धोनी याचे नाव पहिल्यांदा घेतले जाईल. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. असे असले तरी, यावर्षी धोनी आयपीएलमधून निवृत्त घेऊ शकतो. पण धोनी हा निर्णय का घेणार आहे, याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.
एमएस धोनी (MS DHoni) आयपीएलमधून निवृत्त होणार, अशा चर्चा मागच्या काही वर्षांपासून सुरू आहेत. पण धोनीकडून अद्याप आयपीएलमधून निवृत्तीबाबत कुठलेच संकेत मिळाले नाहीत. त्याच्या नेतृत्वातील मागच्या वर्षी सीएसकेने आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली. विशेष म्हणजे चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळून त्यांना गुजरात टायटन्सला मात दिली होती. धोनी आधी म्हणल्याप्रमाणे आपला शेवटचा सामना त्याला होम ग्राउंडवर खेळायचा आहे. अशात सीएसकेला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवल्यानंतर त्याच्याकडे निवृत्तीची चांगली संधी होती. पण तरीही त्याने निवृत्ती घेतली नाहीये. मात्र, आयपीएल 2024 (IPL 2024) हा त्याच्यासाठी शेवटचा आयपीएल हंगाम असण्याची आधीपेक्षा जास्त शक्यता आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे म्हणता येतील.
3. चेपॉकवर शेवटचा आयपीएल सामना खेळम्याचे स्वप्न पूर्ण होणार –
चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल 2024चा पहिलाच सामना चेपॉकवर खेळायचा आहे. त्याची इच्छा आहे की, चेपॉकवर आपल्या चाहत्यांसमोर शेवटचा सामना खेळावा. असे होऊ शकते की, यावेळी सीएसकेसाठी गोन ग्राउंडवर शेवटचा सामना खेळल्यानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेईल. मैदानात धोनी ज्याप्रकारे विरोधी संघाला आपली पुढची चाल कळू देत नव्हता, अगदी त्याच प्रकारे आयपीएलमधून निवृत्तीचेही झाले आहे. कारण दोनी निवृत्तीचा निर्णय कधी घेईल, हे कुणालाच सांगता येत नाही.
2. वाढते वय –
एमएस धोनी सध्या 42 वर्षांचा आहे. फलंदाजीसह तोन यष्टीरक्षकाची भूमिका देखील चांगल्या प्रकारे निभावतो. एखाद्या नवख्या फिरकीपटूला लाजवेल अशी चपळाई त्याने स्टंप्सच्या मागे दाखवली आहे. त्याचे वय इतर खेळाडूंपेक्षा जास्त आहे आणि तो यष्टीरक्षकाची भूमिका देखील पार पाडत आला आहे. मागच्या हंगामात धोनी गुडघ्याच्या दुखापतीसह खेळला होता. दरम्यानच्या काळात त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया देखील पार पडली. अशात यावर्षी तो शेवटचा आयपीएल हंगाम खेळू शकतो. कारण यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना यापुढे त्याला अडचणी येऊ शकतात.
1. सीएससाठी युवा खेळाडूंना संधी देणे –
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पंड्याला याला संघात घेतले आणि कर्णधारपद त्याच्याकडे सोपवले. पाच वेळा मुंबईला ट्रॉफी जिंकवून देणारा रोहित शर्मा यावर्षी हार्दिकच्या नेतृत्वात खेळताना दिसेल. चाहत्यांना हा निर्णय पटला नाही. पण संघ व्यवस्थापनाने मुंबई इंडियन्सच्या भविष्याचा विचार करून युवा खेळाडूकडे कर्णधारपद सोपवले आहे.
एमएस धोनी याची क्रिकेट कारकीर्द देखील जवळपास संपली आहे. अशात लवकरच सीएसकेला त्याच्या जागी एखाद्या युवा खेळाडूकडे कर्णधारपद सोपवाले लागणार आहे. त्याचसोबत प्लेइंग इलेव्हनमध्येही एखाद्या युवा खेळाडूला स्थान मिळू शकते, जो भविष्यात सीएसकेचा महत्वाचा खेळाडू देखील बनू शकतो. जर आतापासूनच नवीन कर्णधार आणि खेळाडूंचा विचार केला नाही, तर सीएसकेसाठी ही अडचणीची बाब ठरू शकते. (IPL 2024. Three main reasons why Dhoni will play his last IPL season this year)
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024: चेपॉकवर कोण कुणाला भारी? धोनीची चेन्नई की विराटची आरसीबी, काय सांगतात आकडे?
पंच वृंदा राठी यांची ऐतिहासिक कामगिरी, असं करणाऱ्या बनल्या देशातील पहिल्या महिला