इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2025 हंगामाचा मेगा लिलाव सोमवारी (25 नोव्हेंबर) जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडला. दोन दिवस चाललेल्या या मेगा लिलावात 10 संघांनी 639.15 कोटी रुपये खर्च करून एकूण 182 खेळाडूंना खरेदी केले. यावेळी लिलावात असे अनेक खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या जुन्या संघांसोबतचे अनेक वर्षांचे नाते संपवले आणि नव्या संघासह सुरुवात करण्यास सज्ज झाले आहेत.
या खेळाडूंमध्ये एक मोठे नाव भुवनेश्वर कुमार आहे. जो या लीगच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. भारताच्या या स्विंग गोलंदाजाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मेगा लिलावात 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले आणि त्यामुळे 11 वर्षांपासून सुरू असलेले सनरायझर्स हैदराबादशी असलेले नातेही तुटले.
ऑरेंज आर्मीशी संबंध तोडल्यानंतर भुवनेश्वर कुमार भावूक झाला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट केली असून सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझी तसेच चाहत्यांचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
भुवनेश्वर कुमारने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. “हैदराबादसह 11 अविश्वसनीय वर्षांनंतर, मी या संघाचा निरोप घेतो. माझ्याकडे अनेक अविस्मरणीय आणि संस्मरणीय आठवणी आहेत. जसे की उत्कृष्ट विजय, विजेतेपदे, दोनदा पर्पल कॅप जिंकणे आणि बरेच काही.”
पुढे त्याने लिहले की, “एक गोष्ट अविस्मरणीय आहे ती म्हणजे चाहत्यांचे प्रेम जे शानदार होते! तुमचा पाठिंबा कायम आहे. मी आज कोण आहे हे मला घडवल्याबद्दल ऑरेंज आर्मीचे आभार. हे प्रेम आणि पाठिंबा मी नेहमीच माझ्यासोबत ठेवीन.”
भुवनेश्वर कुमार आतापर्यंत फक्त 2 संघांसोबत सामने खेळताना दिसला आहे. त्याने 2011 मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाकडून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तो 2014 पासून सनरायझर्स हैदराबादमध्ये सामील झाला. ज्यात त्याने सातत्याने चमकदार कामगिरी केली. या दरम्यान 2016 आणि 2017 च्या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकण्यातही तो यशस्वी ठरला. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 176 सामने खेळले असून 181 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
हेही वाचा-
“खेळ तुम्हाला धडा शिकवतो…”, पृथ्वी शाॅबाबत रिकी पाँटिंगचे मोठे वक्तव्य!
IPL 2025; पाकिस्तानपाठोपाठ बांग्लादेशचाही आयपीएलमधून सफाया? एकाही खेळाडूवर बोली नाही
केन विल्यमसन पुन्हा ठरला नर्व्हस नाईंटीजचा बळी, सचिन तेंडुलकरसह या यादीत टॉप-2 मध्ये सामील