आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, सर्व 10 संघांनी त्यांच्या रिटेंशन याद्या जाहीर केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सने (RR) 6 खेळाडूंना कायम ठेवले आहे, ज्यात इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरचा समावेश नाही. 2018 पासून बटलर राजस्थान फ्रँचायझीचा भाग होता. 34 वर्षीय बटलरने राजस्थानने आगामी हंगामासाठी आपल्याला रिटेन न केल्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सुंदर आठवणींसाठी त्याने फ्रँचायझीचे आभार मानले आहेत.
‘मी आणि माझे कुटुंब…’
बटलरने रविवारी (03 नोव्हेंबर) इंस्टाग्रामवर राजस्थानच्या जर्सीमधील काही फोटो शेअर करताना लिहिले की, “राजस्थान रॉयल्स आणि 7 अविश्वसनीय हंगामांसाठी फ्रँचायझीशी संबंधित प्रत्येकाचे आभार. 2018 हे माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्षांची सुरुवात आहे. गेल्या 6 वर्षांतील माझ्या अनेक सुंदर आठवणी गुलाबी जर्सीशी संबंधित आहेत. माझे आणि माझ्या कुटुंबाचे खुल्या हाताने स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. अजून बरंच काही लिहिता येईल पण सध्या एवढंच.”
View this post on Instagram
बटलरने 2016 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. बटलरने आयपीएलमध्ये आतापर्यंत 107 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटने 3582 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 7 शतके आणि 19 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार असलेल्या बटलरने आयपीएल 2024 मध्ये 11 सामन्यांत 140.78 च्या स्ट्राइक रेटने 359 धावा केल्या होत्या. त्याने आयपीएल 2023 मध्ये 392 आणि आयपीएल 2022 मध्ये 863 धावा केल्या होत्या.
या खेळाडूंना कायम ठेवले
राजस्थानने कर्णधार संजू सॅमसन आणि सलामीवीर यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी 18 कोटी रुपयांमध्ये तर रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना प्रत्येकी 14 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याच वेळी, शिमरॉन हेटमायरला 14 कोटी आणि संदीप शर्माला 4 कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित आणि विराटने निवृत्त व्हावे; न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी केले ट्रोल
वानखेडे कसोटीतील पराभवानंतर रोहितच्या नेतृत्त्वावर ‘डाग’, न्यूझीलंडने विक्रमांचा रचला ढीग
IND vs NZ; पराभवानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “आम्ही आमचे सर्वोत्तम…”