कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील एक प्रतिष्ठित संघ आहे. 2008 पासून या संघाने अनेक चढ-उतार पाहिले असून विविध अनुभवी खेळाडूंनी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. या संघाने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले असून, त्यांच्या कर्णधारांनी संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यात अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे.
गौतम गंभीर हा केकेआरचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार मानला जातो. 2011 ते 2017 या कालावधीत त्याने संघाचे नेतृत्व केले. त्याने 122 सामन्यात संघाची कमान सांभाळली. त्यात त्याने 69 सामन्यात विजय मिळवला तर 51 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये ट्राॅफी जिंकला.
गंभीरनंतर 2018 मध्ये दिनेश कार्तिकला कर्णधारपद देण्यात आले. त्याने 2020 पर्यंत 37 सामन्यात संघाचे नेतृत्व केले. कार्तिकच्या नेतृत्वाखाली संघाने प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले, परंतु अंतिम विजेतेपद जिंकण्यात अपयश आले. 2022 मध्ये श्रेयस अय्यरने कर्णधारपद स्वीकारले ज्यात 29 सामन्यात कर्णधारपद सांभाळताना संघाला 2024 चे जेतेपद मिळवून दिले.
केकेआरचा पहिला कर्णधार सौरव गांगुली होता, ज्याने 2008 ते 2010 या कालावधीत 27 सामन्यांचे नेतृत्व केले. त्यानंतर ब्रेंडन मॅक्युलमने 2009 मध्ये तात्पुरते कर्णधारपद सांभाळले. 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू जॅक कॅलिसनेही दोन सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली.
2020 मध्ये इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनला संघाची जबाबदारी देण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआने 2021 मध्ये अंतिम फेरी गाठली, पण विजेतेपद मिळवू शकला नाही. त्याने 21 सामन्यात संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर 2023 मध्ये नितीश राणाने कर्णधारपद स्वीकारले आणि एका हंगामासाठी (14 सामने) नेतृत्व केले.
कोलकाता नाईट रायडर्सचे आजपर्यंतचे कर्णधार
गाैतम गंभीर
2011-17
सामने – 122
दिनेश कार्तिक
2018-20
सामने – 37
श्रेयस अय्यर
2022-24
सामने 29
साैरव गांगुली
2008-10
सामने – 27
इऑन माॅर्गन
2020-21
सामने – 21
नितीश राणा
2023-23
सामने – 14
ब्रेंडन मॅक्युलम
2009-09
सामने – 13
जॅक कॅलिस
2011-11
सामने – 2






