सुनील नरेनने कोलकाता नाईट रायडर्सकडून अनेक वेळा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गोलंदाजीसोबतच तो स्फोटक फलंदाजीतही तज्ज्ञ आहे. आयपीएल 2025 मध्ये सुनील एक खास विक्रम करू शकतो. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात सुनील षटकारांचे शतक पूर्ण करू शकतो.
खरंतर सुनील नरेनने आतापर्यंत स्पर्धेत 177 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 1534 धावा केल्या आहेत. सुनीलने स्पर्धेत 97 षटकार मारले आहेत. आता तो फक्त 3 षटकार मारून आपले षटकारंचे शतक पूर्ण करू शकतो. जर सुनील नरेनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले तर तो चमत्कार करू शकतो. त्याने आयपीएलमध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकेही झळकावली आहेत. या काळात त्याने 164 चौकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 142 सामन्यांमध्ये 357 षटकार मारले आहेत. रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहितने 257 सामन्यांमध्ये 280 षटकार मारले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू विराट कोहलीने 252 सामन्यांमध्ये 272 षटकार मारले आहेत.
केकेआरची प्लेइंग इलेव्हन –
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, स्पेन्सर जॉन्सन, वरुण चक्रवर्ती.