गुरुवारी(२९ ऑक्टोबर) झालेल्या आयपीएलच्या ४९व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. या पराभवाने ‘प्ले ऑफ’ साठीचा मार्ग केकेआर संघासाठी आता आणखी कठीण झाला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीस उतरलेल्या केकेआर संघाने १७२ धावा धावफलकावर लावल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. फाफ डू प्लेसिसच्या अनुपस्थितीत पुनरागमन केलेला शेन वॉटसन मात्र फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. कोलकाताच्या गोलंदाजांनी शेवटी खेळात जीव ओतला परंतु रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन्ही चेंडूवर षटकार मारून चेन्नईला आनंद साजरा करण्याची संधी तर कोलकाताला मात्र चिंतेत टाकले.
चेन्नईसाठी या सामन्यात सर्वात मोलाची कामगिरी करणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ
१.ऋतुराज गायकवाड
चेन्नईसाठी सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडने पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 37 चेंडूत अतिशय सावधपणे आपले अर्धशतक झळकावले. त्याने एकूण 53 चेंडूंचा सामना करीत सहा चौकार दोन षटकार मारत 72 धावांची खेळी केली.
२. अंबाती रायडू
शेन वॉटसन बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रायडूने 20 चेंडूंची वेगवान खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार ठोकुन 38 धावा केल्या. तसेच ऋतुराजसह 68 धावांची भागीदारी करून तो तंबूत परतला.
३. लुंगी एन्गिडी
चेन्नईचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीने त्याच्या चार षटकांत ३१ धावा देऊन केकेआरचे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. त्याने नितीश राणा आणि ओएन मॉर्गन यांना बाद केले. हे दोन्ही बळी चेन्नईसाठी महत्त्वाचे ठरले.
४. सॅम करन
अष्टपैलू सॅम करन हा या सामन्यात फारशी मोठी कामगिरी करु शकला नसला तरी त्याने दिलेले योगदान हे संघाच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्याने जडेजा सह ३८ धावांची भागीदारी करताना नाबाद १३ धावा जोडल्या. तर गोलंदाजी करताना त्याने ३ षटकात २१ धावा दिल्या.
५. रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजा हा या सामन्याचा खरा शिलेदार मानला जात आहे. शेवटच्या दोन षटकांत ३० धावा हव्या असताना त्याने ११ चेंडूत ३१ धावांची आक्रमक खेळी केली. ज्यात त्याने दोन चौकार व तीन षटकार ठोकून कोलकाताच्या तोंडातून विजय खेचून आणला. शेवटच्या दोन चेंडूत ७ धावांची गरज असताना त्याने सलग २ षटकार ठोकून त्याने संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला विश्वचषकात पराभूत करता न आल्याची ‘या’ दिग्गज खेळाडूला वाटतेय खंत
बाप रे बाप! साक्षी धोनीने चेन्नईच्या ‘या’ खेळाडूचे केले कौतुक
धोनीच्या चेन्नई संघातील ‘हा’ खेळाडू सर्वोत्कृष्ट अष्टपैलू असेल, गौतम गंभीरची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख –
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…