आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे पार पडत आहे. आयपीएल 2024 हंगामासाठी मिनी लिलाव होत आहे. यामध्ये एकूण 333 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. त्यामध्ये मोठमोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. या मिनी लिलावात अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लागल्या त्यातच उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा समीर रिजवी यानेही या लिलावासाठी आपले नाव दिले होते. यामध्ये अनेक संघांनी त्याच्यावर बोली लावली. पण त्या खरेदीच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली.
समीर रिजवी (Sameer Rizvi) याने या आयपीएल 2024 लिलावात (IPL 2024) 20 लाख रुपयांची बेस प्राईज ठेवली होती. त्याला संघात घेण्यासाठी चेन्नई (Chennai Super Kings) आणि कोलकाता (Kolkata Night Riders) संघात चढाओढ लागली होती, पण अखेरीस चेन्नईने (CSK) त्याला 8.40 कोटी रुपयात आपल्या संघाचा भाग बनवले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये 11 टी20 सामन्यात 295 धावा केल्या आहेत. आयपीएल 2024चा हंगाम एप्रिल-मे मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. (IPL Auction 2024 20-year-old player becomes a millionaire, Chennai makes 8 crores of 20 lakhs)
हेही वाचा
अनकॅप्ड शुभम दुबेची लॉटरी! राजस्थान रॉयल्सने खर्च केली 5.8 कोटी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये अवघ्या…
आयपीएल 2015 नंतर खेळणारे ठरले नशीबवान! पाहा प्रत्येक हंगामातील महागडा खेळाडू