---Advertisement---

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

On: रविवार, एप्रिल 11, 2021 12:56 AM
Rishabh-Pant
---Advertisement---

शनिवारी (१० एप्रिल) आयपीएल २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना झाला. हा सामना दिल्ली संघाने ७ विकेट्सने जिंकला. हा सामना दिल्लीचा नवनियुक्त कर्णधार रिषभ पंतसाठी खास होता. पंत पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळला. विशेष म्हणजे चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी होता. त्यामुळे या सामन्याच्या आधीपासूनच ‘गुरु-शिष्य’ असा हा सामना असेल, असे म्हटले जात होते.

कारण धोनी हा पंतचा आदर्श आहे. तसेच पंतकडे भारतीय क्रिकेटमध्ये धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जाते. याबरोबरच धोनी आणि पंत यांच्यात मैदानाबाहेरही चांगली मैत्री आहे. त्यामुळे धोनीविरुद्ध आपले नेतृत्व कौशल्य दाखवण्याबद्दल पंतने या सामन्यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती.

शुक्रवार दिनांक ९ एप्रिल रोजी बोलताना रिषभ पंत म्हटला होता की, ‘धोनीच्या विरुद्ध नाणेफेकीसाठी येणे माझ्यासाठी खूप भाग्यवान असेल. मी यावेळी पहिल्यांदा दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे आणि माही भाईच्याच संघाच्या विरोधात माझा पहिली सामना आहे. त्याच्यासोबत खेळण्यातून मला बराच अनुभव मिळाला आहे. मला आशा आहे की आम्ही उद्याचा सामना जिंकू.’

पंत पुढे बोलताना म्हणाला की, ‘कर्णधार म्हणून पहिलाच सामना आहे. मला यावेळी १०० टक्के योगदान द्यायचे आहे. यष्टीरक्षक म्हणून मला चांगली कामगिरी करून दाखवायची आहे. त्यामुळे मैदानावर क्षेत्ररक्षण लावताना माझे लक्ष सर्वत्र असेल.’

खरंतर दिल्लीचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे होते. पण मागील महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात भारताकडून खेळताना श्रेयस अय्यर जखमी झाला त्यामुळे त्याला आयपीएलच्या १४ व्या हंगामाला मुकावे लागले. त्याच्या खांद्यावर काहीदिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीने या आयपीएल हंगामाकरीता पंतकडे कर्णधारपद दिले.

पंतने सांगितले की कर्णधार म्हणून शिकत असताना तो संघातील शिखर धवन, आर आश्विन आणि अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूंशी सतत बोलत आहे. तसेच मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांच्याशीही तो चर्चा करत आहे. तसेच रिषभ पंतने सांगितले की या संघात खेळाडूंचा उत्तम समतोल आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---