---Advertisement---

हीच ती वेळ…! कोलकाता विरुद्ध वादळी खेळी केल्यावर श्रेयस अय्यरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

---Advertisement---

शारजाह| आयपीएलमध्ये शनिवारी (3 ऑक्टोबर) झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 18 धावांनी पराभव केला. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. त्याने 38 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. शारजाहच्या छोट्या मैदानावर मोठी खेळी खेळण्याची ही योग्य वेळ होती आणि मी हाच विचार घेऊन मैदानात फलंदाजीसाठी आलो होतो, असे श्रेयसने सामन्यानंतर सांगितले.

श्रेयसचा सामनावीर पुरस्काराने झाला गौरव

शारजाहच्या छोट्या मैदानावर दिल्लीने 4 गडी गमावून 228 धावा केल्या. प्रत्युत्तररादाखल कोलकाता संघ 20 षटकांत 8 बाद 210 धावाच करू शकला. दिल्लीकडून कर्णधार श्रेयसने 88 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

प्रथम फलंदाजी करून जिंकणे आहे अवघड

विजयानंतर अय्यर म्हणाला, “या मैदानावर मोठी धावसंख्या करूनही तुम्हाला जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि म्हणूनच प्रथम फलंदाजी करून देखील सामना जिंकणे अवघड आहे. या मैदानातील सामने नेहमीच उत्साहवर्धक असतात. हा सामनाही अटीतटीचा होता आणि आम्ही यात विजय मिळवला.”

विजयाची मालिका ठेवायची आहे कायम

आपल्या वादळी खेळीबद्दल बोलताना तो म्हणाला, “या छोट्या मैदानावर गोलंदाजांवर दबाव आणण्याची हीच योग्य संधी होती असे मला वाटले. मी फार विचार करत नव्हतो.मी असे म्हणणार नाही की हे माझ्यासाठी सोपं काम होत. मी माझ्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतो आणि आता आम्हाला विजयाची मालिका कायम ठेवावी लागेल.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---