आयपीएल 2020 ची स्पर्धा अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स,सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी ‘प्ले ऑफ’ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला बाहेरचा रस्ता धरावा लागला. निराशाजनक कामगिरी नंतर हे सर्व संघ पुढील हंगामात पुनरागमन करण्याच्या दृष्टीने अनेक मोठे बदल संघात करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहेत.
याचदरम्यान या हंगामात ज्या खेळाडूंनी निराशा केली त्यांनाही संघ आता बाहेर करण्याचा विचार करू शकतात. संघाबाहेर काढल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीत काही दिग्गज भारतीय खेळाडू देखील असू शकतात. त्यातील 4 भारतीय खेळाडूंचा या लेखात आढावा घेऊया.
1. इशांत शर्मा
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा इशांत शर्मा या हंगामात दुखापतीमुळे फक्त एकच सामना खेळू शकला. भारतीय संघात फक्त कसोटी सामन्यांतच इशांतला खेळवण्यात येते. अशात दिल्लीने टी-20 साठी त्याच्यावर अतिरिक्त विश्वास टाकून त्याला संघात घेतले होते. पण आता दिल्लीचा संघ इशांत शर्मा ऐवजी पुढील हंगामात एखादा युवा गोलंदाज संघात घेऊ शकतात.
2. रॉबिन उथप्पा
कोलकाता नाईट राईडर्स संघाने बाहेर केल्या नंतर राजस्थान रॉयल्सने 3 कोटी रुपयांच्या किंमतीत रॉबिन उथप्पाला संघात समाविष्ट केले. मात्र त्याने संपूर्ण हंगामात संघाची प्रचंड निराशा केली. 14 पैकी 12 सामन्यांत त्याला खेळण्याची संधी मिळाली. वरच्या व मधल्या फळीत खेळताना त्याने फक्त 196 धावा या हंगामात केल्या. त्यामुळे उथप्पाला राजस्थानचा संघ पुढील हंगामापूर्वी बाहेर करू शकतो.
3. केदार जाधव
भारतीय संघाचा महत्त्वाचा मानला जाणारा फलंदाज केदार जाधव या हंगामात सपशेल अपयशी ठरला. चेन्नई सुपर किंग्स संघासाठी मधल्या फळीत खेळताना जसा खेळ संघाला आवश्यक होता तसा खेळ तो करू शकला नाही. धोनीचा खराब खेळ सुरू असतानाच केदारही अपयशी ठरल्याने चेन्नईला मधली फळी सावरता आली नाही आणि त्यांना बरेच सामने गमवावे लागले. यानंतर काही सामन्यांत धोनीने केदारला संघाबाहेर बसवले होते. केदारने 8 सामन्यांत खेळताना केवळ 62 धावा केल्या आहेत. यामुळे 7 कोटी रुपये मोजून संघात घेतलेल्या केदार जाधवला चेन्नईचा संघ पुढील हंगामापूर्वी संघातून मुक्त करून त्याच्या जागी 2 युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो.
4. दिनेश कार्तिक
आयपीएल 2020 च्या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सने दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली केली होती. पण नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत असताना कार्तिकच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. त्यामुळे हंगामाच्या अगदी मध्यावर त्याने मॉर्गनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली. पण इतका बदल करूनही कार्तिक धावा करू शकला नाही. त्याने सर्व सामने खेळुनही मात्र 169 धावाच केल्या. अशा प्रदर्शना नंतर कोलकाताचा संघ कदाचित त्याला पुढील हंगामापूर्वी बाहेर करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
क्वालिफायर सामन्यापूर्वी नव्या लुकमध्ये दिसला बुमराह, दिल्लीविरुद्ध मैदानात उतरताना…
बेंगलोरचा ‘हा’ स्टार क्रिकेटर फलंदाजांसाठी ठरणार डोकेदुखी, शेवटच्या टप्प्यात…
भारतीय लष्कराला सलाम! ज्या गावात अतिरेक्यांच्या खात्मा केला, तिथेच आयोजित केली क्रिकेट स्पर्धा
ट्रेंडिंग लेख –






