कोरोना व्हायरसच्या धोका पाहता आज (14 मार्च) मुंबईमध्ये इंडियन प्रिमीयर लीगच्या गवर्निंग काउंसिलची बैठक पार पडली. ज्यामध्ये आयपीएलला 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्याच्या निर्णयानंतर बदललेल्या परिस्थितींवर चर्चा करण्यात आली. यावेळी बीसीसीआयचे सर्व अधिकारी आणि संघ मालक उपस्थित होते.
या बैठकीत आयपीएल संदर्भात 6-7 वेगवेगळे पर्याय सूचवण्यात आले. ज्यात आयपीएलचे सामने कमी करण्याचाही पर्याय सूचवण्यात आला. तसेच, आयपीएलचे आयोजन अवघ्या 2 किंवा 3 राज्यात करण्याच्या विषयावरही चर्चा झाली. यात गरज पडल्यास विदेशी खेळाडूंना घेऊ नये आणि रिकाम्या स्टेडियममध्ये सामने घेण्यात यावे, असेही पर्याय सुचवण्यात आले.
बैठकीनंतर बीसीसीआयने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात सचिव जय शहा यांनी म्हटले की, “आयपीएलच्या सर्व संघांना आणि बोर्डला चाहत्यांची आणि खेळाडूंची चिंता आहे. आयपीएलचे सर्व फ्रंचायझी बीसीसीआयच्या या निर्णयाशी सहमत आहेत. प्रत्येक निर्णय घेतेवेळी खेळाडू, चाहते आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या स्वास्थाचा विचार करण्यात आला आहे. तसेच, बीसीसीआय केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संपर्कात असेल आणि त्यानंतर आयपीएलचा शेवटचा निर्णय घेतला जाईल.”
किंग्स इलेव्हन पंजाबचे सह-मालक नेस वाडिया यांनी सांगितले की, “बीसीसीआय, आयपीएल आणि स्टार नेटवर्क यांनी स्पष्टपणे म्हटले की त्यांना आर्थिक नुकसानावरती जास्त भर द्यायचा नाही. तसेच, बैठकीत परदेशातील आयपीएलच्या आयोजनावरही चर्चा झालेली नाही.”
ट्रेंडिंग घडामोडी-
– कोरोना इफेक्ट: कॅप्टन कोहलीचा चाहत्यांना खास संदेश
– अनोखी मैत्री: खेळाडूचं उतरले मैदान कर्मचार्यांच्या मदतीला
– भारत-द. आफ्रिका वनडे मालिकेपाठोपाठ ‘ही’ मोठी…