एखादी गोष्ट एखाद्या साठी लकी अनलकी असणे हा खरंतर मनाचा समज मानला जातो. पण यातून जर एखादी गोष्ट सतत घडत असेल तर ते खरं आहे की काय ? असा एक मनाचा समज खरा वाटू लागतं. जसं परीक्षेत एखाद्याला एखादा पेन लकी वाटतो. त्याच पेनाने जास्त गुण मिळतात हा त्याच्या मनाचा समज असतो. कदाचीत असंच काहीसं रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर बाबतीत झालं आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण बेंगलोर संघ जेव्हाही हिरवी जर्सी परिधान करतो तेव्हा त्यात ते बऱ्याचवेळा पराभूत झाले आहेत.
तसेच रविवारीही चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळताना बेंगलोरच्या खेळाडूंनी हिरवी जर्सी घातली होती. या सामन्यातही त्यांना ८ विकेट्सने पराभवाचे तोंड पाहावे लागले.
नक्की काय आहे हिरव्या जर्सीतील बेंगलोरची आकडेवारी –
बेंगलोर संघ २०११ पासून पर्यावरण जनजागृतीसाठी प्रत्येक आयपीएल हंगामामध्ये बेंगलोरचा संघ दुपारी होणाऱ्या एका सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरतो. ‘गो ग्रीन इनिशीएटिव्ह’ या संकल्पने अंतर्गत ही जर्सी घालून संघ आपल्याला गेल्या १० वर्षांपासून खेळताना दिसत आहे.
या जर्सीतला पहिला सामना बेंगलोरने जिंकला होता. पण नंतर त्यांना २०१२, २०१३, २०१४ ला या जर्सीत खेळताना पराभव स्विकारावा लागला. २०१५ ला या जर्सीतील सामन्याचा निकाल लागला नाही. तसेच २०१६ ला मात्र बेंगलोर संघ ही जर्सी परिधान केल्यानंतर जिंकला आहे. पण नंतर पुन्हा २०१७, २०१८, २०१९ आणि आता २०२०ला या संघाला हिरवी जर्सी घातल्यानंतर पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ही जर्सी अनलकी असल्याचे बेंगलोरच्या अनेक चाहत्यांचे मत आहे.
बेंगलोरने हिरव्या जर्सीत खेळलेल्या एकूण १० सामन्यांपैकी फक्त २ च सामने जिंकले आहेत. तर ७ सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आणि एक सामना हा अनिर्णित राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कधी जय, कधी पराजय…’, CSKसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाल्यानंतर साक्षी धोनीने व्यक्त केल्या भावना
“शेवटच्या वेदनादायक १२ तासांचा आनंद घ्या”, असे का म्हणाला एमएस धोनी, घ्या जाणून
‘दसऱ्याच्या मेळ्यातून केली जोरदार शॉपिंग,’ सॅम करनच्या नव्या लूकवर जबरदस्त मिम्स व्हायरल
ट्रेंडिंग लेख –
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती