आयपीएल आणि बीसीसीआय सध्या एक मोठा विक्रम नोंदवण्याच्या तयारीत आहे. आयपीएलच्या नवीन मीडिया हक्कांच्या लिलावानंतर आयपीएलचे प्रति सामन्याची किंमत १०० कोटींच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आयपीएल जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी क्रीडा मालमत्ता बनेल. असे झाल्यास आयपीएल ही प्रीमियर लीग आणि मेजर लीग बेसबॉल या स्पर्धांना प्रति सामन्याच्या किंमतीत मागे टाकेल.
सन २०२३ ते २०२७ पर्यंत मीडिया हक्कांसाठी बोर्डाने ३२,८९० कोटी रुपयांची मूळ किंमत निश्चित केली आहे. टीव्ही हक्कांची मूळ किंमत प्रति सामन्यासाठी ४९ कोटी, तर डिजिटल हक्क प्रति सामन्यासाठी ३३ कोटी आहे. स्पोर्ट्स मीडिया राइट्स तज्ज्ञांच्या मते, “प्रति सामन्यातील टीव्ही अधिकार २०-२५% वाढण्याची अपेक्षा नाही, परंतु डिजिटल अधिकारांचे पॅकेज वाढू शकते. एकत्रित मूल्य प्रति सामन्यासाठी ११५-१२० कोटींपर्यंत पोहोचू शकते. सध्या, अमेरिकेची एनएफएल सर्वात महाग क्रीडा मालमत्ता मानली जाते. एनएफएलमध्ये प्रति सामना मूल्य १३४ कोटी आहे. त्याच वेळी, प्रीमियर लीगमधील प्रति सामन्याचे मूल्य ८१ कोटी रुपये आहे.”
यंदा होणाऱ्या लिलावाचे एकूण चार गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. यातील पहिल्या आणि दुसऱ्या गटाचा लिलाव एकाच दिवशी होणार असल्याचे बोर्डाने सांगितले. सोबतच तिसऱ्या आणि चौथ्या गटाचा लिलाव दुसऱ्या दिवशी होणार आहे. ही प्रक्रिया ई-ऑक्शनद्वारे पार पडेल.
दरम्यान, मागील वेळी २०१८ ते २०२२ या काळात १६,३४८कोटी रुपयांना मीडिया हक्क विकण्यात आले होते. भारतीय उपखंडातील श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि मालदीव या देशांमधील आयपीएलचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली अशा ७ भाषांमध्ये याचे प्रक्षेपण केले जाते. आयपीएल २०२२चे प्रसारण स्टार स्पोर्ट्स चॅनेल आणि डिस्नी प्लस हॉटस्टारवर झाले. गेल्या हंगामात, लीग सामन्यांची दर्शक संख्या ३५० दशलक्ष होती.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खेळाडूला ‘या’ गोष्टीचा अभिमान असावा; धोनीचा नवख्या क्रिकेटर्सला मोलाचा संदेश
क्रिकेटर्सच्या शोधासाठी ‘या’ क्लबने लढवली अनोखी शक्कल, थेट बिअरचा ग्लास अन् टिंडरवर दिली जाहिरात