आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा चौथा सामना काल 22 सप्टेंबर 2020 रोजी शारजाह येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या चेन्नई संघाचा या सामन्यात पराभव झाला.
राजस्थान संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. या संघाने चेन्नईला 217 धावांचे लक्ष दिले. मात्र राजस्थान च्या डावाच्या 18 व्या षटकांत धोनीने संयम गमावला व तो पंचाशी वाद घालताना दिसला.
असा झाला वाद
18 व्या षटकातील 5 वा चेंडू फलंदाज टॉम करनच्या पॅडवर लागला आणि यष्टीरक्षक धोनीपर्यंत पोहोचला. धोनीने झेल घेऊन अपील केले. पंचाने फलंदाजाला बाद करार दिले. जेव्हा टॉम करनने डीआरएस घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे आढळले त्याच्या संघाकडे डीआरएस शिल्लक नाही. टॉम करनने पंचाला विचारले की त्याला झेलबाद देण्यात आले की पायचीत. पंचाने झेलबाद दिला असे सांगितले. यावर करनने असा प्रश्न केला की धोनीने बरोबर झेल घेतलेला नाही. यावर पंचांनी मैदानातल्या दुसऱ्या पंचाची मदत घेतली. हे प्रकरण स्पष्ट झाले नाही आणि तिसर्या पंचांची मदत घेण्यात आली. टीव्ही रीप्लेवरून असे दिसून आले की धोनीच्या हाती चेंडू येण्यापूर्वी तो जमिनीवर आदळला आला होता. तिसऱ्या पंचाने करन नाबाद असल्याचे घोषित केले.
धोनी डीआरएसबाबत घालत होता वाद
तिसरे पंच नाबाद हा निर्णय देत असताना धोनी मैदानातील पंचांशी वाद घालताना दिसला. यावेळी तो डीआरएसबद्दल बोलतांना दिसत होता. तो पंचांना सांगत होता की राजस्थान रॉयल्स संघाकडे डीआरएस शिल्लक नाही तरीही पंचांनी कोणत्या आधारे हे प्रकरण तिसऱ्या पंचाकडे पाठवले? राजस्थान संघाचा फलंदाज राहुल तेवटीयाने पायचीत घोषित झाल्यानंतर डीआरएस घेतला. परंतु हा निर्णय कायम ठेवण्यात आला. त्यामुळे राजस्थानने डीआरएसही गमावला.
Nick Name – Captain Cool..
Job – Fighting With Umpire's.. #RRvCSK #IPL2020 pic.twitter.com/CSm61AtkXD
— V I P E R™ (@Offl_TheViper) September 22, 2020
2019 मध्येही मैदानात केला होता प्रवेश
2019 मध्येही धोनी आणि पंच यांच्यात भांडण झाले होते. आयपीएल च्या 12 व्या हंगामातील 25 वा सामना चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यादरम्यान झाला होता. या सामन्याच्या शेवटच्या षटकात गोलंदाज बेन स्टोक्स गोलंदाजी करत होता. याच षटकात वाद झाला होता. मुद्दा असा होता की सामन्याच्या अखेरच्या षटकात पंच उल्हास गांधीने सुरुवातीला नो बॉल देण्यासाठी हात वर केला.
परंतु चेंडू कंबरेच्या वर असल्याचे लेग पंच ब्रूस ऑक्सनफोर्डकडून कोणतेही संकेत मिळालेले नव्हते. यानंतर गांधींनी नो बॉल दिला नाही. हे पाहून धोनी संतापला, त्यावेळी तो मैदानाबाहेर बसला होता. धोनी मैदानात घुसला आणि पंचाशी वाद घालू लागला. तथापि, पंचाने निर्णय बदलला नाही. त्यानंतर धोनीला सामना शुल्कापैकी 50 टक्के दंड ठोठावण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-फक्त ९० धावा आणि मुंबईचा कर्णधार रोहित घालणार ‘या’ शानदार विक्रमाला गवसणी
-पाहा तर स्मिथ काय म्हणतोय, धोनी- फाफने शेवटच्या षटकात चांगले शॉट्स ठोकले, पण…
-क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता करता येणार वानखेडे स्टेडियमची सफर
ट्रेंडिंग लेख-
-चेन्नई-राजस्थान सामन्यात बनले मोठे विक्रम, संजू सॅमसनच्या नावावर झाली ‘एवढ्या’ विक्रमांची नोंद
-मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी
-दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम