सध्या वर्ल्ड क्रिकेटमधील सर्वात मोठा ब्रँड कोणता असेल तर तो आहे आयपीएल. आयपीएलसोबत जगातील सर्व टॉप ब्रँड, सेलिब्रिटी, बिझनेस ग्रुप आणि प्लेयर्स जोडले जाण्याची इच्छा बाळगतात. केवळ पैसाच नव्हे तर फेमही मिळत असल्याने त्यांची ही इच्छा होणे स्वाभाविक आहे. ज्या ठिकाणी पैसा आहे त्या ठिकाणी ग्लॅमरही असतेच. आयपीएलच्या मॅचेस पाहण्यासाठीच कितीतरी बॉलिवूड सेलिब्रिटी येत असतात, पण त्याहून वेगळेपण म्हणजे या आयपीएल फ्रॅंचाईजींच्या काही मालकिणीच इतक्या हॉट आणि ग्लॅमरस आहेत की, फॅन्सना ग्राउंडपर्यंत घेऊन येण्यासाठी दुसऱ्या कोणत्या सेलिब्रिटींची गरज पडत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयपीएलच्या त्याच पाच चार्मिंग टीम ओनर्सची ओळख करून घेऊया.
प्रीती झिंटा
आयपीएलमध्ये ग्लॅमर या गोष्टीची सुरुवात कोणी केली असेल, तर त्यामध्ये पहिले नाव येते बॉलीवूडची डिम्पल क्वीन प्रीती झिंटाचे. खरंतर प्रितीच्या नावाशिवाय या यादीला सुरुवातच होऊ शकत नाही. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने आयपीएल फ्रॅंचाईजी विकत घेतली. अगदी २००८ पासून आजतागायत प्रीती पंजाब किंग्सची को-ओनर राहिलीये. प्रीतीचं खऱ्या अर्थाने आयपीएलच्या पहिल्या काही सीझनमध्ये पंजाबची ब्रँड ॲम्बेसिडर होती. फक्त नावाला ओनर न राहता आयपीएल ऑक्शनपासून, ग्राउंडवर येत टीमला सपोर्ट करण्यापर्यंत ती नेहमीच आघाडीवर राहते. सध्या प्रीती अमेरिकेत सेटल झाली असली तरी, प्रत्येक सीझनच्या काही मॅचेस पाहण्यासाठी ती नक्की हजेरी लावते.
हेही पाहा- सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या आयपीएलच्या टॉप ५ मालकीणबाई
जुही चावला
प्रीतीप्रमाणेच पहिल्या आयपीएलपासून जी लेडी को-ओनर सातत्याने आयपीएलमध्ये दिसतेय ती म्हणजे बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवलेली जुही चावला. शाहरुख खानसोबत जुहीचे पती जय मेहता यांनी कोलकाता नाईट रायडर्स फ्रॅंचायजी विकत घेतलेली, पण टीमचे निर्णय बऱ्यापैकी जुही घेताना दिसते. प्रीतीसारखीच ती ऑक्शन टेबलपासून टीमला ग्राउंडमध्ये येऊन चिअर करण्यासाठी पोहोचते. मागील काही वर्षांपासून जुहीची मुलगी जान्हवी हीदेखील, केकेआरच्या मॅनेजमेंटमध्ये अनेकदा दिसून आली आहे.
शिल्पा शेट्टी
प्रीती झिंटा आणि जुही चावला यांच्याप्रमाणे आणखी एक बॉलीवुड सुंदरी काही वर्ष आयपीएलचा महत्त्वाचा भाग राहिली. ती होती शिल्पा शेट्टी. आपल्या अदांनी अनेक वर्ष चाहत्यांना घायाळ करणाऱ्या शिल्पाने राजस्थान रॉयल्समध्ये इनव्हेस्टमेंट केली होती. राजस्थान पहिल्या आयपीएलचे विनर झाल्यानंतर शिल्पाने आपला पती राज कुंद्रासह संघाचे शेअर्स घेण्याचा निर्णय घेतलेला. ती नेहमी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी यायची. राजस्थान रॉयल्सचे ऍंथम असलेल्या हल्लाबोल या गाण्यासाठी तिने केलेला डान्स आजही अनेकांच्या लक्षात आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात दोषी आढळल्याने राज कुंद्रा यांच्यावर कारवाई झाली आणि शिल्पाला २०१४ मध्ये राजस्थानची ओनरशिप सोडून द्यावी लागली.
काव्या मारन
आयपीएल टीम ओनर आणि त्यांची ग्लॅमरस को-ओनर हे समीकरण जेव्हा समोर येते तेव्हा, त्यातील सर्वात चर्चित नाव ठरते सनरायझर्स हैदराबादची सीईओ आणि को-ओनर काव्या मारन. डेक्कन चार्जर्सने हैदराबाद फ्रॅंचाईजीची मालकी विकल्यानंतर ती सन टीव्हीकडे आली. सन टीव्हीचे सर्वेसर्वा आणि मातब्बर राजकारणी कलानिधी मारन यांची मुलगी कविया ही सनरायझर्सचा कारभार पाहू लागली. तीन-चार वर्षांपूर्वी ऑक्शन टेबलवर सर्वांनी काव्याला पाहिले. त्यावेळी ती मिस्ट्री गर्ल वाटली, पण त्यानंतर तिच्या ओळखीचा उलगडा झाला. गेल्या दोन वर्षापासून तर सनरायझर्स टीमपेक्षा तिचीच जास्त चर्चा होते. नॅशनल क्रश बनलेल्या कवियाचे प्रत्येक एक्सप्रेशन नेहमीच ट्रेंडमध्ये असते.
गायत्री रेड्डी
सनरायझर्स हैदराबाद आधी हैदराबादची आयपीएल फ्रॅंचाईजी डेक्कन चार्जर्स या नावाने ओळखले जायची. डेक्कन क्रॉनिकल्स ग्रुप त्या टीमचे ओनर होते. पण टीमचा सारा कारभार पहायची गायत्री रेड्डी. डेक्कन क्रोनिकलचे मालक असलेल्या व्यंकटराम रेड्डी यांची ती कन्या. आयपीएलमुळे चर्चेत आलेली ती पहिली नॉन बॉलिवूड ग्लॅमरस गर्ल. आपल्या असीम सौंदर्याने तिने लाखो जणांचे हृदय घायाळ केले. गायत्री नेहमीच आपल्या टीमला सपोर्ट करायला ग्राउंडवर पोहोचायची. जोपर्यंत डेक्कन चार्जर्स टीम आयपीएलमध्ये सहभागी होत होती, तोपर्यंत गायत्री नेहमीच चर्चेत राहिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्याही संयमाचा बांध, भलताच झालेला ‘अँग्री यंग मॅन’