इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत किताबावर नाव कोरले. मुंबईचा आयपीएल कारकिर्दीतील हे पाचवे विजेतेपद होते. या संघाने सर्वाधिक वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. मुंबईनंतर चेन्नई सुपरकिंग्जने सर्वाधिक 3 वेळा किताब जिंकला आहे.
विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने त्यांचे 2 विजेतीपदे आणि चेन्नई सुपर किंग्सने त्यांचे 1 विजेतेपद एकाच हंगामात एकाच संघाला 4 वेळा पराभूत करुन मिळवले आहे.
आयपीएलमध्ये एकाच हंगामात एकाच संघाचा तब्बल ४ वेळा पराभव करून विजेतेपद जिंकणारे संघ
चेन्नई सुपर किंग्ज (सन 2018)
सन 2018 साली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल कारकिर्दीतील तिसरा किताब जिंकला होता. मात्र, या हंगामात सनरायझर्स हैदराबादला चेन्नईविरुद्ध एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. चेन्नई हंगामात तब्बल 4 वेळा हैदराबादचा पराभव करत किताब पटकावला. अंतिम सामन्यात देखील चेन्नईने हैद्राबादचा 8 गडी राखून पराभव केला होता.
मुंबई इंडियन्स (सन 2019)
मुंबईने सन 2019 साली बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जचा 4 वेळा सामना केला होता. या चारही सामन्यात मुंबईचेच बाजी मारली आणि आयपीएल कारकिर्दीतील चौथा किताब जिंकला. अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईचा अवघ्या एका धावाने पराभव केला होता.
मुंबई इंडियन्स (सन 2020)
मुंबई इंडियन्सने सन 2020 साली दिल्ली कॅपिटल्सचा 4 वेळा सामना केला. मात्र, या चारही सामन्यात मुंबईचेच बाजी मारली.अंतिम सामन्यात दिल्लीचा 5 गडी राखून पराभव करत मुंबईने कारकिर्दितील 5 वा किताब जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित ‘सुपरहिट’ ! अंतिम सामन्यात अर्धशतक करत रचला अनोखा विक्रम
मैत्री असावी तर अशी! खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवलेले ४ अविस्मरणीय क्षण
आयपीएल २०२० : गुलीगत धोका ! १३ व्या हंगामात सर्वाधिक बळी घेणार ५ महारथी