काल (४ ऑगस्ट) आयर्लंड संघाने विश्वविजेत्या इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात आयर्लंडच्या फलंदाजांनी अविश्वसनीय फलंदाजी प्रदर्शन करत ४९.५ षटकात ३ विकेट्स गमावत इंग्लंडने दिलेल्या ३२९ धावांचे आव्हान पूर्ण केले आणि मालिकेचा शेवट विजयाने केला.
जरी त्यांनी ही वनडे मालिका १-२ च्या फरकाने गमावली असली, तरी त्यांचा शेवटच्या सामन्यातील विजय हा २०११ सालच्या विश्वचषकातील ऐतिहासिक सामन्याची आठवण करुन देतो. २०११ सालच्या विश्वचषकातही आयर्लंडने ४९.१ षटकात ७ विकेट्स गमावत इंग्लंडने दिलेले ३२८ धावांचे आव्हान पूर्ण केले होते आणि ऐतिहासिक विजय मिळवला होता.
काल साउथम्पटन येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ४९.५ षटकात सर्वबाद ३२८ धावा केल्या होत्या. यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या १०६ धावांचा समावेश होता. त्याने ८४ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकार मारत शतकी खेळी केली होती. तसेच, टॉम बॅंटन (५८ धावा) आणि डेविड विली (५१ धावा) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ३२८ धावांचा विशाल स्कोर उभा केला होता.
वनडे मालिकेत २-० च्या फरकाने पिछाडीवर असणाऱ्या आयर्लंड संघाला ३२९ धावांचे आव्हान पूर्ण करणे कठीण जाईल, असे वाटत होते. परंतु, सलामीला फलंदाजीला उतरलेल्या अनुभवी फलंदाज पॉल स्टर्लिंगने १४२ धावांची खेळी करत डाव पालटला. त्याने १२८ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकार मारत शतकी खेळी केली. तसेच, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार अँड्र्यू बालबिर्नीचाही विजयात मोलाचा वाटा राहिला. बालबिर्नीने ११२ चेंडूत १२ चौकार मारत ११३ धावांची शतकी खेळी केली. तसेच, हॅरी टेक्टरच्या नाबाद २९ आणि केविन ओब्रायनच्या नाबाद २१ धावांच्या खेळीनेही संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
आयर्लंडने ५० धावांवर त्यांची पहिली विकेच गमावली होती. ८.९ षटकात डेविड विलीने सलामीवीर फलंदाज ग्रेथ डेलनीला फक्त १२ धावांवर त्रिफळाचीत केले होते. मात्र, स्टर्लिंग आणि बालबिर्नीने पुढे डाव सांभाळला. त्यांनी दोघांनी ४२व्या षटकापर्यंत दमदार फलंदाजी करत २१४ धावांची भागिदारी केली. परंतु, संघाच्या २६४ धावांवर स्टर्लिंग धावबाद होऊन पव्हेलियनला परतला. मात्र, तेव्हापर्यंत संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता.
इंग्लंडच्या गोलंदाजांना जास्त चांगले गोलंदाजी प्रदर्शन करता आले नाही. डेविड विलीने १० षटकात ७० धावा देत फक्त १ विकेट घेतली. तसेच, मोईन अलीने ७ षटकात ५१ धावा तर टॉम करन १० षटकात ६१ धावा देत एकही विकेट घेतली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
यावेळी आयपीएलमध्ये चुकिला माफी नाही! ती एक चुक खेळाडूंना पडणार भलतीच महागात
आयपीएल २०२० खेळणार नाही, सर्वाधिक चर्चेत असलेला मिचेल स्टार्क, न खेळण्याचे…
३ वनडेत ८ चेंडू खेळून १ धाव करत ३ वेळा बाद होण्याचा कारनामा केलाय या खेळाडूने
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटच्या टी-२० प्रकारात सर्वाधिक चेंडू खेळणारे ७ क्रिकेटर, २ आहेत भारतीय
कॅप्टन्सीची एकही संधी न मिळता सर्वाधिक कसोटी सामन्यात टीम इंडियाची सेवा करणारे ३ दिग्गज
सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी