जगातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध मानली जाणारी टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. या स्पर्धेच्या १५व्या हंगामातील दुसरा सामना रविवारी (२७ मार्च) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. या सामन्यात मुंबईचा विस्फोटक फलंदाज इशान किशनने तुफान फटकेबाजी करत सर्वाधिक धावा ठोकल्या. त्यामुळे त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, मुंबईच्या (Mumbai Indians) फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. मुंबईकडून सलामीला उतरलेल्या इशान किशनने (Ishan Kishan) जबरदस्त फटेकबाजी केली. त्याने सर्वाधिक ८१ धावा ठोकल्या. यासह तो मुंबई इंडियन्सकडून फलंदाजी करताना सलग ३ अर्धशतक ठोकणारा दुसरा भारतीय ठरला. हा कारनामा यापूर्वी मुंबईचा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) केला होता.
इशान किशनचे मागील ३ अर्धशतके
इशानने मागील वर्षी म्हणजेच आयपीएल २०२१मध्ये शारजाह येथे खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध २५ चेंडूत नाबाद ५० धावा ठोकत अर्धशतक पूर्ण केले होते. यावेळी त्याने ३ षटकार आणि ५ चौकार ठोकले होते. त्यानंतर त्याने २०२१मध्येच अबू धाबी येथे खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३२ चेंडूत नाबाद ८४ धावांंची खेळी केली. या धावा करताना त्याने ४ षटकार आणि ११ चौकारांचा पाऊस पाडला होता. आता आयपीएल २०२२च्या दुसऱ्याच सामन्यात त्याने दिल्लीविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये खेळताना ४८ चेंडूत नाबाद ८१ धावा ठोकल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ११ चौकार मारले.
त्याच्या एकूण सलग ३ डावांबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आपल्या मागील ३ सामन्यात १०५ चेंडूंमध्ये २०४.७६च्या स्ट्राईक रेटने २१५ धावा केल्या. या धावा करताना त्याने ९ षटकार आणि १७ चौकार ठोकल्या होत्या. सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीविरुद्ध निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १७७ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs DC: दिल्लीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; मुंबईकडून ५ खेळाडूंचे पदार्पण
अर्रर्र! मागील १० हंगामांपासून मुंबई इंडियन्स ‘या’ गोष्टीत ठरतोय फ्लॉप; वाचून तुम्हालाही बसेल शॉक