भारतीय क्रिकेट संघाचे लवकरच कसोटी हंगाम सुरु होणार आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये दुलीप ट्रॉफी 2024 चा उत्साह देखील कायम आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडूही आपली ताकद दाखवत आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतही काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून त्यात यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनचे नावही सामील आहे. त्याने भारत ब विरुद्ध पहिल्या डावात उत्कृष्ट शतक झळकावले.
ईशान किशन गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर आहे. तसेच तो बीसीसीआयच्या केंद्रीय कराराचा भागही नाही. वास्तविक बीसीसीआयने सांगितल्यानंतरही त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळेच त्याला या सगळ्याचा सामना करावा लागला. मात्र ईशान आता पुन्हा संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे. दुलीप ट्रॉफीपूर्वी त्याने बुची बाबू स्पर्धेतही शतक झळकावले होते.
दुखापतीमुळे तो दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत सहभागी होऊ शकली नाही. पण दुसऱ्या फेरीत त्याने 111 धावांची चांगली खेळी खेळली आहे. पीटीआयच्या अहवालावरनुसार, बांग्लादेशविरुद्ध ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी ईशानला टीम इंडियाच्या संघात स्थान मिळू शकते. मात्र रिषभ पंतला मालिकेसाठी विश्रांती मिळाल्यासच हे शक्य होईल.
टी20 विश्वचषकातही पंत आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी झाली नाही. कदाचित बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत ईशान त्याच्या जागी टी20 संघात स्थान मिळवू शकतो. बांग्लादेश विरुद्ध टी20 मालिका 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे. दरम्यान शुबमन गिललाही या टी20 मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनाही भारताच्या कसोटी क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-
VIDEO : युवा फलंदाजाचं दुर्दैव…असा विचित्र रनआऊट यापूर्वी कधीच पाहिला नसेल
PAK VS BAN; पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर बांग्लादेश क्रिकेट संघावार पैशांचा पाऊस!
जसप्रीत बुमराहकडे इतिहास रचण्याची संधी, केवळ 3 विकेट घेताच बनेल मोठा रेकॉर्ड!