भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन याने गुरुवारी (20 ऑक्टोबर) जबरदस्त खेळी शतक केले. इशान किशन सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 मध्ये झारखंड संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मुश्ताक अली ट्रॉफीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये इशान मोठी खेळी करू शकला नव्हता, पण ओडिशाविरुद्ध गुरुवारी त्याने वादळी शतक ठोकले. या सामन्यातील शेवटच्या तीन चेंडूत 14 धावा करून त्याने शतक पूर्ण केले.
गुरुवारी झारखंड आणि ओडिसा यांच्यातील हा टी-20 सामना लखनऊमध्ये खेळला गेला. ओडिसा संघाचा कर्णधार अभिषेक राऊत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याने घेतलेला हा निर्णय सुरुवातीला योग्य ठरेल, असे वाटले होते. कारण झारखंडने पहिली विकेट अवघ्या दोन धावांवर गमावली होती. सलामीला आलेला इशान किशन (Ishan Kishan) शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि वैयक्तिक शतक देखील पूर्ण केले. इशान जरी या सामन्यातल खेलपट्टीवर टिकून राहिला असला, तरी दुसऱ्या बाजून झारखंडचे फलंदाज एकापाठोपाठ विकेट्स गमावत राहिले.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या झारखंड संघाने 20 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 188 धावा केल्या. इशान किशनने यामध्ये 64 चेंडूत 102 धावांचे योगदान दिले. या धावा त्याने 5 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने केल्या. कुमार सूरज झारखंडसाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 25 चेंडूत 32 धावा केल्या. ओडिसा संघासाठी तरानी सा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने झारखंडच्या तब्बल तीन खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला.
झारखंडकडून मिळालेले 189 धावांचे लक्ष्य गाठताना ऑडिसा संघ 19.2 षटकात 117 धावांपर्यंत मजल मारू शकला. इशान किशनप्रमाणेच ऑडिसाचा फलंदाज शांतनू मिश्रा देखील मोठी खेळू करू शकला. शांतनूने 50 चेंडूत 54 धावा केल्या. झारखंडचा अनुभवी फिरकी गोलंदाज शाहबाद नदीमने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. विरोधी संघाला स्वस्तात बाद करण्यासाठी नदीमने झारखंडसाठी सर्वात मोठे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माजी ऑस्ट्रेलियान दिग्गज बनला पंजाब किंग्जचा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आणणार कामी
बड्डे आहे भावाचा! सचिनने सेहवागला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, इथेही केली सिक्सर मारण्याची विनंती