वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यान होत असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. ईशान किशन व शुबमन गिल यांनी संघाला या सामन्यात शतकी सलामी दिली. या मालिकेत सलामीवीर म्हणून बढती मिळालेल्या ईशानने संपूर्ण दौऱ्यावरील आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत, पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले.
या सामन्यात मालिका विजय साजरा करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारताला किशन व गिल यांनी जबरदस्त शतकी सलामी दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 143 धावा केल्या. ईशानने बाद होण्यापूर्वी 64 चेंडूंवर 77 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये 8 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.
ईशान या संपूर्ण दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्या कसोटीत त्याला फलंदाजी करण्याची फारशी संधी मिळाली नाही. मात्र, दुसऱ्या कसोटीत संधी मिळत असताना केवळ 33 चेंडूंवर अर्धशतक केले. त्यानंतर वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इतर फलंदाज संघर्ष करत असताना तो अर्धशतक करण्यात यशस्वी ठरला. त्याने दुसऱ्या सामन्यातही हा फॉर्म कायम ठेवला आणि आणखी एक अर्धशतक बनवले. त्यानंतर आता या सामन्यातही त्याने पन्नाशी पार करत संघातील आपली जागा पक्की केली आहे.
(Ishan Kishan Sublime Form Continues In West Indies Tour)
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब; वेगवान गोलंदाजाचे एक वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन
रिंकूचे नशीब फळफळले! 18 दिवसात 2 वेळा मिळाली टीम इंडियात जागा; म्हणाला, ‘दररोज 6 तास…’