शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. आज (१८ जुलै) कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर उभय संघांमध्ये वनडे मालिकेतील पहिलावहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्यातून झारखंडचा युवा क्रिकेटपटू ईशान किशन आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपली ‘सेंकड इनिंग’ सुरू करू शकतो. अर्थातच ५० षटकांच्या वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. विशेष म्हणजे, आज ईशानचा २३ वा वाढदिवस आहे. त्यामुळे जर त्याला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली; तर आजचा खास दिवस त्याच्यासाठी अजूनच खास बनेल.
तत्पुर्वी मार्च २०२१ मध्ये अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यातून युवा फलंदाज ईशानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याबरोबरच, पदार्पणाच्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावून त्याने वाहवा मिळवली. मात्र, याच ईशानला काही वर्षांपूर्वी भर रस्त्यात मारहाण करण्यात आली होती. नक्की हे प्रकरण काय होते आपण जाणून घेऊया.
झाला होता अपघात
सन २०१६ मध्ये म्हणजेच पाच वर्षांपूर्वी ईशानला पटना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या ईशानने आपल्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. त्या रिक्षातील काही लोक त्यावेळी जखमी झाले होते. त्यानंतर त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली गेलेली.
केली गेली मारहाण
ईशानने रिक्षाला धडक दिल्यानंतर तेथे लोक जमा झाले होते. ईशानने लोकांशी हुज्जत घातल्यानंतर, काहींनी त्याला मारहाण देखील केली होती. पोलिसांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवले होते. मात्र, ईशान व अन्य काही जणांविरुद्ध त्यावेळी गुन्हा दाखल केला गेला होता.
पदार्पणात दमदार अर्धशतक
ईशानने काल (१४ मार्च) इंग्लंडविरुद्ध भारतासाठी पहिला टी२० सामना खेळला. तो भारताकडून टी२० क्रिकेट खेळणारा ८४ वा खेळाडू बनला. सलामीवीर म्हणून खेळताना ईशानने अवघ्या ३२ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने आक्रमक ५६ धावा ठोकल्या. त्याने पदार्पणातच सामनावीर पुरस्कार मिळवला. त्याच्या या खेळीनंतर सर्वांनी त्याचे कौतुक केले.
भारताने केली मालिकेत बरोबरी
पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने भारतीय संघावर ८ गड्यांनी मात केली होती. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला ७ गड्यांनी हरवत मालिकेत बरोबरी केली. भारतासाठी कर्णधार विराट कोहली व इशान किशन अर्धशतके झळकावली. तर, गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. मालिकेतील तिसरा सामना १६ मार्च रोजी खेळला जाईल.
वाढदिवस विशेष-
रांचीतील मैदाने गाजवणारा इशान किशन पुढे बनला रोहितचा हुकमी एक्का, वाचा त्याच्याबद्दल
विश्वचषकासाठी स्म्रीतीने दिली नव्हती बारावीची परिक्षा, १७व्या वर्षी नाबाद द्विशतक ठोकत आली चर्चेत