मुंबई । भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा संघातला सर्वात अनुभवी क्रिकेटपटू आहे. क्रिकेटपटू म्हणून त्याने त्याच्या कारकीर्दीत अनेक चढ उतार पाहिले आहेत. कसोटी संघातला नियमित सदस्य असलेला इशांत 300 कसोटी विकेटचा टप्पा पूर्ण करण्यासाठी अवघ्या 3 विकेट दूर आहे. त्याने देशाला त्याचा अभिमान वाटवा अशी कामगिरी केली आहे. पण त्याच्या आयुष्यात एक सामना असा होता ज्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले होते. त्या सामन्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडले हे एका मुलाखतीत त्यानी सांगितले आहे.
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या शो क्रिकेटमध्ये शर्मा म्हणाला की, “2013 मध्ये माझ्या आयुष्यात वेगळे वळण आले.” फॉकनरने मोहाली येथे झालेल्या तिसर्या वनडे सामन्यात एका षटकात 30 धावा केल्या. कांगारुंना 28 चेंडूत 44 धावांची गरज असताना धोनीने इशांतला चेंडू दिला. त्यावेळी या वेगवान गोलंदाजाने चार षटकारांसह 30 धावा दिल्या आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरला.
फॉकनरला 29 चेंडूत 64 धावां केल्याने सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 304 धावांचा पाठलाग करून 2-1 अशी आघाडी मिळविली. याचा फटका इशांतला बसला त्याला संघातून वगळण्यात आले. संघातून वगळण्यात आल्याने त्याचा आत्मविश्वासही कमी झाला.
तो म्हणाला, “त्यावेळी मला वाटलं की मी स्वत: चा आणि माझ्या देशाचा विश्वासघात केला आहे. दोन-तीन आठवडे मी कोणाशीही बोललो नाही. मी खूप रडलो. मी खूप कठोर मनुष्य आहे. माझी आई म्हणते की तिने माझ्यापेक्षा कठोर व्यक्ती पाहिली नाही. पण मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि लहान मुलासारखा फोनवर रडलो. ते तीन आठवडे एका भयानक स्वप्नासारखे होते. मी खाणे-पीणे बंद केले. मी झोपू शकत नव्हतो किंवा इतर काहीही करू शकत नाही. टेलिव्हिजन चालू केले आणि लोक टीका करत होते,” असे इशांत म्हणाला.
”मी आता याबद्दल हसतो. त्यात एक आशीर्वाद लपला आहे असे वाटते. कधीकधी आपल्याला आपली ताकद समजण्यासाठी धक्का बसण्याची आवश्यकता असते. फॉकनरच्या घटनेनंतर मी माझ्या आयुष्यात मोठे बदल केले. 2013 नंतर मी काही गोष्टी गंभीरपणे घेऊ लागलो. पूर्वी, माझी कामगिरी खराब राहिली असेल तर लोक येऊन मला सांगत होते की हे क्रिकेट आहे यात अनेक चढ उतार होत असतात. पण 2013 नंतर येऊन असे जर कोणी मला सांगितले असते तर मी त्यांचे हे ऐकले नसते. कारण मला माझी चूक समजली होती. आणि मी ती मान्य केली होती. मी जबाबदारी घ्यायला शिकलो,” असे इशांत शर्माने सांगितले.
भारतासाठी 300 कसोटी विकेट्स पूर्ण करण्यासाठी इशांत अवघे तीन विकेट दूर आहे. या वर्षाच्या अखेरीस जेव्हा भारत ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल तेव्हा तो हा 300 बळीचा टप्पा पूर्ण करेल. एवढेच नाही तर 100 कसोटी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सामील होण्याचीही इशांतला संधी आहे. इशांतने आत्तापर्यंत 97 कसोटी सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अपंग भारतीय क्रिकेटर्सचे होतायत हाल, सौरव गांगुलीकडून आहे मदतीची अपेक्षा
गेल्या ४ वर्षात अशी अफलातून कामगिरी करणारा शान मसूद पहिलाच सलामीवीर
“टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील,” बजरंग पुनिया
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू…
आयपीएल २०२० – या ५ युवा परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर…
आयपीएलमध्ये खेळाडू आणि कर्णधार म्हणून सुपर डुपर फ्लॉप ठरलेले ४ दिग्गज