---Advertisement---

आॅस्ट्रेलियाच्या या वेगवान त्रिकूटापेक्षाही इशांत शर्माने अॅडलेडवर खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने

---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना 6 डिसेंबरला खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5.30 वाजता सुरु होणारा हा सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे.

या मैदानावर भारतीय संघाचा गोलंदाज इशांत शर्माने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड आणि मिशेल स्टार्क यांच्यापेक्षाही अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

झाले असे की, अॅडलेडवर 2015, 2016 आणि 2017 मध्ये दिवस-रात्रीचे कसोटी सामने जे गुलाबी चेंडू वापरून खेळण्यात आले होते. त्यातील दोन कसोटी सामन्यात हॅझलवूड आणि स्टार्क यांचा सहभाग होता. तसेच 2017चा कसोटी सामन्यासाठी कमिन्स संघात होता.

यामुळे शर्माने लाल चेंडूचे कसोटी सामने या मैदानावर कमिन्स, हॅझलवूड आणि स्टार्क या तिघांपेक्षा अधिक खेळले आहेत.

तसेच ऑस्ट्रेलियाने त्या तीनही दिवस-रात्र कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून 64 कसोटी सामने खेळणाऱ्या पीटर सिडलने या मैदानावर एकूण 7 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या 2015च्या दिवस-रात्रीचा सामन्याचाही समावेश आहे. मात्र त्याला भारता विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघात घेतले नाही.

2007मध्ये कसोटीत पदार्पण करणाऱ्या शर्माने अॅडलेडच्या ओव्हल मैदानावर 3 सामन्यात खेळताना 5 विकेट्स घेतले आहेत.

तसेच भारतीय संघाने 1948ला येथे पहिला कसोटी सामना खेळला असून एकूण 11 कसोटी सामने खेळले आहेत. 2003ला मिळवलेला विजय हा भारताचा या मैदानावरील एकमेव विजय आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाने उपकर्णधारालाच दिला डच्चू

Video: गंभीरचा दिलदारपणा; स्वत:चा सामनावीर पुरस्कार त्यावेळी दिला २१ वर्षीय कोहलीला

२०११ च्या विश्वचषकातील फक्त हे दोन खेळाडू सध्या टीम इंडियाकडून खेळत आहेत वनडे क्रिकेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment