इंडियन प्रीमियर लीगचा दिल्ली कॅपिटल्स संघ या हंगामात शानदार प्रदर्शन करत आहे. नुकत्याच मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झालेल्या आयपीएल २०२०च्या २७व्या सामन्यानंतर त्यांनी गुणतालिकेत दूसरा क्रमांक पटकावला आहे. अशात संघाला खूप मोठा झटका बसला आहे. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा पूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे.
७ ऑक्टोबर रोजी नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करत असताना त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्याची ही दुखापत गंभीर असल्यामुळे तो आयपीएल २०२०मधून बाहेर पडल्याचे सांगितेल जात आहे. अजूनही फ्रंचायझीने या गोष्टीची अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, त्यांनी आयपीएल गवर्निंग काउंसिलला इशांतच्या पर्यायी खेळाडूसाठी पत्र लिहले आहे.
इशांतने आतापर्यंत आयपीएलच्या तेराव्या हंगामात केवळ एक सामना खेळला होता. २९ सप्टेंबर रोजी अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तो सामना झाला होता. त्या सामन्यात इशांतने ३ षटके टाकत २६ धावा दिल्या होत्या. दरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नव्हती.
इशांतपुर्वी दिल्ली संघाचा फिरकीपटू अमित मिश्राही दुखापतीमुळे पूर्ण हंगामातून बाहेर पडला होता. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतलाही सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
२००८ साली आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या इशांतला दुखापतीमुळे जास्त संधी मिळाल्या नाहीत. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त ९० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
गुडन्यूज..! मुंबई इंडियन्सच्या ‘या’ सदस्याच्या घरी लवकरच हालणार पाळणा
अनुष्का शर्मा आहे राशिद खानची पत्नी, खोटं वाटतंय तर गूगलवर सर्च करुन पाहा
एका भारतीयासह जगातील दिग्गज क्रिकेट संघ पाकिस्तानात होणार क्वारंटाईन?
ट्रेंडिंग लेख-
“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन का आहे इतका खास?