---Advertisement---

रोहित की विराट? ‘हा’ गोलंदाज म्हणतोय, ‘रोहितला सहज करु शकतो बाद’

On: गुरूवार, मे 20, 2021 11:08 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करणे सर्वात अवघड आहे, असे मोहम्मद आमिरला विचारले गेले होते. आमिरने म्हटले की दोन्ही फलंदाजांना गोलंदाजी करणे मला अवघड वाटले नाही. तो म्हणाला की विराट आणि रोहितसमोर गोलंदाजी करणे मला आवडते. पण विराटपेक्षा रोहितला गोलंदाजी करणे मला अधिक सोपे वाटले.

मोहम्मद आमिर पुढे म्हणाला की, “रोहित शर्माच्या तुलनेत विराट कोहलीला गोलंदाजी करणे आव्हानात्मक होते. कारण दबावामुळे त्याचा खेळ आणखीनच बहरायचा. तो दडपणातील सामन्यांमध्ये ठाम उभा असायचा व त्या सामन्यात तो आणखीनच जबरदस्त खेळायचा. पण रोहित आणि विराट कोहलीला गोलंदाजी करणे मला कधी कठीण जाणवले नाही.”

या दोन्ही फलंदाजांविरुद्ध मोहम्मद आमिरने शानदार कामगिरी केलेली आहे. आमिरने रोहित शर्माविरूद्ध 44 धावा दिल्या आहेत आणि आतापर्यंत त्याला 3 वेळा बाद केले आहे. विराट विरुद्ध मात्र त्याची स्पर्धा आणखी मजबूत झाली आहे. मोहम्मद आमिरने चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 चा अंतिम सामना आणि विश्वचषक 2019 मधील लीग स्टेज मधील सामना अशा दोन वेळा विराटला बाद केले आहे.

विशेष म्हणजे मोहम्मद आमिरने काही वर्षांपूर्वी देखील रोहित शर्मा विषयी असेच विधान केले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये मोहम्मद आमिरने भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना अतिशय कमी धावसंख्येत बाद करून खळबळ उडवून दिली होती. त्या सामन्यानंतर आमिर आणि विराट व रोहित यांच्यात एक वेगळ्याच प्रकारची टक्कर बघायला मिळत असे. मुलाखती दरम्यान मोहम्मद आमिर असेही म्हणाला होता की रोहितला बाद करणे सोपे होते कारण तो दोन्ही मार्गांनी बाद होऊ शकतो. आमिर म्हणाला की रोहितला इन्सविंग व आउट स्विंग या दोन्ही चेंडूद्वारे बाद करता येवू शकते कारण फलंदाजीच्या सुरुवातीला रोहित या दोन्ही चेंडूंविरुद्ध अडखळत असतो.

महत्त्वाच्या बातम्या-

चाहत्यांच्या मागणीवर डेव्हिड वॉर्नरने पुन्हा शेअर केला एक मजेशीर व्हिडिओ, घेतले साऊथ सुपरस्टार धनुषच रुप

भारतीय संघात एन्ट्री करण्यापूर्वी हा खेळाडू झाला होता आयएएसची परीक्षा पास, पदार्पणाच्या सामन्यातच ठोकले होते अर्धशतक

पृथ्वी शॉकडे या गोष्टीची कमी, पाकिस्तानच्या क्रिकेटरने लक्षात आणून दिली शॉची मोठी चूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---