---Advertisement---

जेम्स अँडरसनने इशांत, बुमराहची विकेट घेत भारताविरुद्ध केला ‘हा’ मोठा विक्रम

On: सोमवार, फेब्रुवारी 8, 2021 1:33 PM
---Advertisement---

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. भारताच्या शेवटच्या २ विकेट्स जेम्स अँडरसनने घेतला. योबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.

अँडरसनने भारताच्या पहिल्या डावात इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता त्याच्या भारताविरुद्ध ११२ विकेट्स झाल्या आहेत. तो भारताविरुद्ध कसोटीत ११० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.

या दरम्यान एक खास योगायोगही पाहायला मिळाला. इशांत हा अँडरसनची भारताविरुद्धची १११ वी विकेट ठरला. त्याने इशांतला ११ व्या चेंडूवर बाद केले. विशेष म्हणजे अँडरसनचा हा भारताविरुद्धचा भारतातील ११ वा कसोटी सामना आहे.

भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज – 
११२- जेम्स अँडरसन
१०५ – मुथय्या मुरलीधरन
९४ – इम्रान खान
९४ – नॅथन लायन
७६ – माल्कम मार्शल

बेसने घेतल्या सर्वाधिक विकेट्स –

भारताच्या पहिल्या डावात इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट्स फिरकीपटू डॉमनिक बेसने घेतल्या. त्याने २६ षटकांत ७६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय जॅक लीच, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्यांनी भारताला ३३७ धावांवर रोखण्यात यश मिळवले आणि आपल्या संघाला २४१ धावांनी आघाडीवर ठेवले.

विशेष म्हणजे भारताच्या पहिल्या डावात सर्व १० फलंदाज झेलबाद झाले आहेत. साल २००१ नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ मायदेशात खेळत असताना एका कसोटी डावात सर्व १० फलंदाज झेलबाद झाले आहेत. याआधी २००१ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत खेळताना भारतीय संघाचे १० क्रिकेटपटू एका डावात झेलबाद झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

अश्विनने पहिल्या चेंडूवर दिला इंग्लंडला धक्का, ठरला शानदार किर्तीमान करणारा पहिला भारतीय

कॅच, कॅच अन् नुसते कॅच! चेन्नई कसोटीत पाहुण्यांच्या हातून भारताचा अख्खा संघ झेलबाद

“रिषभ पंतला बेफिकिरी आणि निष्काळजीपणा यातील छोटा फरक कळला तर तो आणखी सातत्यपूर्ण कामगिरी करेल”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---