14 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर सुरु होणार आहे. पण या सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन उजव्या पायाच्या पोटरीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
1 ते 5 ऑगस्ट दरम्यान झालेल्या पहिल्या ऍशेस कसोटी दरम्यान अँडरसनला पहिल्याच दिवशी पोटरीच्या दुखापतीचा त्रास झाला होता. त्यामुळे तो या सामन्यात केवळ पहिल्या डावात 4 षटके गोलंदाजी करु शकला. तसेच त्याने 11 व्या क्रमांकावर दोन्ही डावात फलंदाजी केली. मात्र तो पुढे गोलंदाजी करु शकला नाही.
37 वर्षीय अँडरसनच्या पोटरीचे या सामन्यादरम्यान स्कॅनही करण्यात आले . या स्कॅनमध्ये त्याला पोटरीची दुखापत असल्याचे दिसले आहे. त्यामुळे आता त्याच्यावर इंग्लंड आणि लँकाशायर संघांची मेडीकल टीम लक्ष देईल.
अँडरसन मागील महिन्यापासून या दुखापतीचा सामना करत आहे. त्याला काउंटी क्रिकेटमध्ये लँकाशायरकडून डरहम विरुद्ध खेळताना 2 जूलैला पोटरीची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला मागील महिन्यात झालेल्या आयर्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यालाही मुकावे लागले होते.
परंतू तो पहिला ऍशेस सामना खेळण्यासाठी फिट झाला होता. मात्र त्याला पुन्हा या दुखापतीचा त्रास झाला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्याआधी किरॉन पोलार्डला झाली मोठी शिक्षा
–आयपीएमध्ये सर्वात पहिले शतक करणाऱ्या ब्रेंडन मॅक्यूलमची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
–पहिल्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय