---Advertisement---

लोकल बॉय इन ॲक्शन! केएल राहुलला अँडरसनने ‘असं’ बाद करत इंग्लंडला मिळवून दिली पहिली विकेट

On: शनिवार, सप्टेंबर 4, 2021 11:44 PM
---Advertisement---

सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरू झाला आहे. यात इंग्लंडने पहिल्या डावात २९० धावा करत भारतीय संघावर ९९ धावांची आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने दुसऱ्या दिवसापर्यंत बिनबाद ४३ धावा केल्या होत्या. मात्र, तिसर्‍या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात एक मोठा झटका बसला. आतापर्यंत या मालिकेत इंग्लंडकडून कमालीची गोलंदाजी करणारा आणि लोकल बॉय जेम्स अँडरसनने दुसऱ्या डावात इंग्लंडला पहिली विकेट मिळवून दिली.

भारतीय संघ दुसऱ्या डावात ९९ धावांनी पिछाडीवर होता. यानंतर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी तिसऱ्या दिवशी ४३ च्या धावसंख्येवरून पुढे आणखी ४० धावा जोडल्या. मात्र ३४ व्या षटकात लोकल बॉय असलेल्या अँडरसनने राहुलला ४६ धावांवर बाद केले.

डावाच्या ३४ व्या षटकात अँडरसनने टाकलेला अखेरचा चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टोकडे गेला. सुरुवातीला मैदानातील पंच या विकेटबाबत संभ्रमात होते. मात्र, नंतर त्यांनी राहुलला बाद घोषित केले. यासह दुसऱ्या डावात अँडरसनने इंग्लंडला पहिली विकेट मिळवून दिली.

दरम्यान, पहिल्या डावात भारतीय संघाने शार्दुल ठाकूर आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीमुळे १९१ धावांचा टप्पा गाठला. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही भारतीय फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. ज्यानंतर इंग्लंडची देखील पहिल्या डावात अत्यंत खराब सुरुवात झाली जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स आणि हसीब हमीदला स्वस्तात माघारी धाडले. ज्यानंतर उमेश यादवने देखील आतापर्यंत या मालिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या जो रूटला त्रिफळाचीत करत महत्वपूर्ण विकेट घेतली.

मात्र, इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी करत २९० धावा केल्या आणि भारतीय संघावर ९९ धावांची आघाडी मिळवली. ऑली पोपने ८१ धावांची खेळी केली. तसेच ख्रि वोक्सने ५० धावा केल्या.

यानंतर भारताकडून दुसऱ्या डावात वरच्या फळीने शानदार फलंदाजी केली. रोहितने १२७ धावांची शतकी खेळी केली. तर, चेतेश्वर पुजाराने ६१ धावा केल्या. त्यामुळे तिसऱ्या दिवसाखेर भारताने ९२ षटकात ३ बाद २७० धावा करताना १७१ धावांची आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –
धोनीबाबत विचारलेल्या ‘या’ प्रश्नाबाबत गांगुली-सेहवाग संभ्रमात, विशेष तज्ञांची घ्यावी लागली मदत
बुमराहने वाढवली टीम इंडियाची चिंता! चौथ्या कसोटीत गोलंदाजीदरम्यान घ्यावे लागले होते उपचार
मुंबईकरने गाजवले ओव्हलचे मैदान! इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा रोहित जगातील पहिलाच सलामीवीर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---